शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रेमंड समूह रिटेल बाजारात उतरणार; १०० कोटी गुंतवणुकीत ५ हजार रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 23:58 IST

‘मिहान-सेझ’मध्ये उद्योग स्थापनेचा विचार नाही, गौतम हरी सिंघानिया यांनी स्पष्ट केले

नागपूर : रेमंड समूह रिटेल बाजारात उतरणार असल्याची माहिती रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांनी येथे दिली. वैविध्यपूर्ण योजनांचा एक भाग म्हणून हा समूह फॅब्रिकपासून सुट तयार करेल. त्यामुळे मूल्यवर्धनासोबतच रोजगाराचे प्रमाण वाढविण्यात मोठा लाभ होईल, असा दावाही त्यांनी केला.

नागपूरपासून ३५ किमी अंतरावर कळमेश्वरजवळील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या (आयएमटी) दीक्षांत समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पोलाद उद्याेगानंतर वस्त्रोद्योग क्षेत्रात सर्वाधिक रोजगारनिर्मितीची क्षमता असून शंभर कोटींच्या गुंतवणुकीत ते ५ हजार लोकांना रोजगार पुरवू शकतो. आता, भारत हा जागतिक घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे आणि सर्व देश भविष्याची शक्ती म्हणून भारताकडे पाहत आहेत. अलीकडच्या वर्षांत भारताची निर्यातही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर भारताला भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे ते म्हणाले.

‘मिहान-सेझ’मध्ये युनिट स्थापनेची योजना नाहीगौतम सिंघानिया म्हणाले, कंपनीचे विदर्भात अमरावती आणि यवतमाळ येथे दोन प्रकल्प आहेत. अन्य प्रकल्प छिंदवाड्यात आहेत. मिहान - सेझमध्ये युनिट स्थापन करण्याची समूहाची कोणतीही योजना नाही.

भारतातील व्यवसायाची इको सिस्टिम सर्वोत्तमजगभरातील उद्योजकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. भारतही त्याला अपवाद नाही. परंतु भारतातील व्यवसायाची इको सिस्टिम सर्वोत्कृष्ट असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. कामगार विवादांना सामोरे जाण्यासाठी सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. पत्रपरिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि आ. सुनील केदार उपस्थित होते.

भारत जोडो यात्रेचा मार्ग आधीच ठरलेला होताकमलनाथ म्हणाले, भारत जोडो यात्रेचा भौगोलिक मार्ग आधीच ठरलेला होता. त्यामुळेच ही यात्रा विदर्भात येऊ शकली नाही. महात्मा गांधींनी अनेक वर्षे मुक्काम केलेल्या सेवाग्रामला भारत जोडो यात्रेने स्पर्श का केला नाही, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, महात्मा गांधी वर्ध्याजवळील या छोट्याशा गावातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे मार्गदर्शन करत होते. देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे महात्मा गांधींनी त्यांच्या कार्याच्या पाऊलखुणा सोडल्या आहेत आणि सेवाग्राम त्यापैकी एक आहे.

टॅग्स :Raymondरेमंड