नागपूर : गेल्या तीन वर्षापासून नागपूर बोर्डाच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीरीत्या पेलणारे, लॉकडाऊनच्या काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाचे यशस्वी नियोजन करून राज्यात नागपूर बोर्डाचे कामकाज प्रथम श्रेणीत आणणाऱ्या नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सचिव रविकांत देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, सेवानिवृत्त सहसंचालक महेश करजगावकर, माजी उपसंचालक भाऊ गावंडे, विभागीय सचिव माधुरी सावरकर, सहा. सचिव विश्वनाथ जोग, प्रशांत आर्वे, गजानन वानखेडे, मेश्राम, बोडाले आदी उपस्थित होते. विभागीय शिक्षण उपसंचालक पारधी यांच्याहस्ते त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले.
रविकांत देशपांडे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:17 IST