शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या धान्याचे वाहन, पोलिसांची एन्ट्री अन् व्हायरल व्हिडीओ, धान्याचा काळाबाजार करणारे वाहन पोलिसांनी घटनास्थळीच सोडून दिले

By नरेश डोंगरे | Updated: December 22, 2025 22:10 IST

Nagpur News: काळाबाजारीचा संशय असलेले वाहन घेऊन कथित आरोपी समोर जातात तर कारवाईसाठी आलेले पोलिस माघारी फिरतात. मात्र, यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण येते.

- नरेश डोंगरे नागपूर - शहरातील कुख्यात रेशन माफियाचे वाहन एका दुकानातून धान्य घेऊन निघते. या धान्याची काळाबाजारी होत असल्याचा संशय असल्याने एक सजग नागरिक कंट्रोल रुमला फोनवरून माहिती देतो. त्यामुळे जरीपटक्याचे दोन पोलीस मध्येच येऊन हे वाहन थांबवितात. त्यानंतर तेथे रेशन माफिया पोहचतो. अर्थपूर्ण बोलणी होते अन् नंतर पांगापांग होते. काळाबाजारीचा संशय असलेले वाहन घेऊन कथित आरोपी समोर जातात तर कारवाईसाठी आलेले पोलिस माघारी फिरतात. मात्र, यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण येते.

घटना जरीपटक्यातील आहे. १८ डिसेंबरच्या दुपारी ३ च्या सुमारास चांदवानी नामक व्यक्तीच्या ठिकाणाहून कुख्यात रेशन माफिया विकी कुंगानीची माणसं एमएच ४९/ एटी ९१२५ मध्ये स्वस्त धान्य दुकानाचे रेशन धान्य भरतात. हे वाहन पढे निघाल्यानंतर काळाबाजारीचा दाट संशय असल्याने एका सजग नागरिकाने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे कंट्रोल रूमच्या माध्यमातून जरीपटका ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. त्या पोलिसांनी ते वाहन रोखले. विचारपूस सुरू असतानाच तेथे कुख्यात रेशन माफिया विक्की पोहोचला. सलामदुवा केल्यानंतर त्याने पोलिसांनी चर्चा केली. तेथे काय बातचीत झाली कळायला मार्ग नाही. मात्र, त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हे वाहन सोडून दिले. या सर्व प्रकारावर नजर ठेवून असलेल्या सजग नागरिकांनी या प्रकरणाचा व्हिडिओ, फोटो मोबाईलमध्ये घेऊन ते व्हायरल केले. त्यानंतर रविवारपासून संबंधित वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. धान्याच्या काळाबाजारीला जरीपटका पोलिसांची साथ असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

कोणती चाैकशी केली ?धान्याची काळाबाजारी करणाऱ्या त्या वाहनाची आणि व्यक्तीची संबंधित पोलिसांनी कोणती चाैकशी केली. त्यांनी वाहनातील धान्य तपासले का, त्यात त्यांना काय आढळले, त्यांनी संबंधित वाहन पोलिस ठाण्यात नेण्याची तसदी का घेतली नाही, धान्याच्या वाहनाला जागेवरूनच सोडून देण्याचा निर्णय त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून घेतला, अशी एक ना अनेक प्रश्न चर्चेला आली आहे. वरिष्ठांकडून या प्रकरणाची कशी दखल घेतली जाते आणि गोरगरिबांच्या ताटातील अन्न खुल्या बाजारात नेऊन काळाबाजारी करण्यास मदत करणारांवर कोणती कारवाई केली जाते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मॉलच्या मागेही पकडले होते वाहनयापूर्वी जरीपटक्यातील जिंजर मॉलच्या मागे पोलिसांनी रेशनचा साठा पकडला होता. मात्र, त्यानंतर कोणती कारवाई झाली ते पुढे आले नाही. यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघर्षनगर येथेही संबंधित विभागाच्या पथकाने कारवाई केली होती. या कारवाईत लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Ration grain vehicle, police entry, viral video: Black market vehicle abandoned.

Web Summary : A suspicious ration vehicle was stopped by police in Jaripatka, Nagpur, after a tip-off. The vehicle was allegedly involved in black market activity. After discussions with a known ration mafia figure, police released the vehicle, sparking controversy and a viral video, raising questions about potential police complicity.
टॅग्स :nagpurनागपूर