शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

वडिलांच्या अपघातानंतर रतन बनला आधार : नागपूर रेल्वेस्थानकावर वाहतोय ओझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 22:22 IST

वडिलांना अपघात झाला. त्यांच्या पायात रॉड टाकल्यामुळे त्यांना रेल्वेस्थानकावर ओझे उचलणे अशक्य झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अखेर रतनने आपल्या इच्छाआकांक्षांचा बळी दिला अन् अंगावर कुलीचा लाल ड्रेस चढविला. रेल्वेस्थानकावर सध्या सर्वात कमी वयाचा कुली म्हणून रतन प्रवाशांचे ओझे वाहत आहे.

ठळक मुद्देसर्वात कमी वयाचा कुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजकालची मुले दहावी झाली की कॉलेजात जाताना वडिलांपुढे बाईकचा हट्ट धरतात. खर्चासाठी त्यांना पॉकेट मनीही हवा असतो. घरच्यांकडून त्यांचे नको ते लाड पुरविले जातात. परंतु १९ वर्षाच्या रतनच्या वाट्याला हे सुख आले नाही. दहावीनंतर घरच्या परिस्थितीमुळे त्याने कपड्याच्या दुकानात काम केले. वडील कुली असल्यामुळे मिळेल त्या कमाईत ते कुटुंबाचा गाडा हाकत होते. परंतु त्यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली. रतनच्या वडिलांना अपघात झाला. त्यांच्या पायात रॉड टाकल्यामुळे त्यांना रेल्वेस्थानकावर ओझे उचलणे अशक्य झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अखेर रतनने आपल्या इच्छाआकांक्षांचा बळी दिला अन् अंगावर कुलीचा लाल ड्रेस चढविला. रेल्वेस्थानकावर सध्या सर्वात कमी वयाचा कुली म्हणून रतन प्रवाशांचे ओझे वाहत आहे.नारी येथील तक्षशिला नगरातील मनोहर मेश्राम (६१) नागपूर रेल्वे स्थानकावर कुली म्हणून कामाला होते. त्यांना पत्नी, अजय आणि रतन अशी दोन मुले आहेत. अजय पदवीधर तर रतन दहावी पास आहे. दिवसभर प्रवाशांचे ओझे वाहून मिळालेल्या पैशातून ते मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचे पालनपोषण करीत होते. परंतु नियतीला हे मान्य नव्हते. १७ जून २०१८ रोजी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाले असताना रेल्वेस्थानकाजवळ त्यांचा अपघात झाला. यात त्यांच्या पायात रॉड टाकल्यामुळे त्यांना अपंगत्व आले. प्रवाशांचे भारी ओझे उचलणे त्यांना शक्य झाले नाही. त्यानंतर खरा प्रश्न निर्माण झाला तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा. मनोहर मेश्राम हे आपल्या दोन्ही मुलांना शिकवित होते. मोठा मुलगा अक्षय रेल्वेच्या परीक्षेची तयारी करीत होता. तर लहान मुलगा नुकताच दहावी झाला होता. आपल्या मुलाने कुली व्हावे असे कधीच त्यांना वाटले नसावे. परंतु परिस्थितीपुढे कुणाचे काही चालत नाही असे म्हणतात. त्यांची पत्नीही धुणीभांडी करून घरात चार पैशांची मदत करते. कुटुंबासाठी रतनने मनाचा दृढ निश्चय केला. आपल्या वडिलांचा २६७ क्रमांकाचा कुलीचा बिल्ला घेऊन कुटुंबासाठी आपल्या इच्छाआकांक्षाचा बळी देत कुलीचा लाल ड्रेस अंगावर चढविला. मागील दहा दिवसांपासून तो रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे ओझे त्यांच्या कोचपर्यंत पोहोचवून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत आहे. इच्छा नसतानाही रतनला परिस्थितीमुळे कुलीचे काम करावे लागत आहे. कुटुंबासाठी रतन हसत-खेळत आलेल्या परिस्थितीला सामोरे जात कुलीचे काम करीत आहे.७५ वर्षांचे बाबुरावही वाहतात ओझेशासकीय कर्मचारी ५८ वर्ष झाले की निवृत्त होतात. मिळालेल्या पेन्शनच्या पैशातून ते उर्वरीत आयुष्य सुखाने घालवितात. परंतु रेल्वेस्थानकावर कुलीचे काम करणाऱ्या आणि रामेश्वरी परिसरात राहणाऱ्या बाबुराव तायडे या ७६ वर्षाच्या कुलीच्या वाट्याला अजूनही ओझे उचलण्याचे काम आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर जवळपास १५२ कुली काम करतात. त्यातील बाबुराव एक आहेत. बाबुरावला पत्नी आणि दोन मुले आहेत. मुले कमावती झाली. परंतु ती व्यसनी असल्यामुळे त्यांचे पालनपोषणही अजून त्यांना करावे लागते. हातपाय चालतील तोपर्यंत कुटुंबासाठी कुलीचे काम करावेच लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर