शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-अमरावती महामार्गावरील खापरीजवळ रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:28 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू असून कोंढाळी परिसरातील खापरी (बारोकर) फाटा येथे दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास रास्ता रोको करण्यात आले. टायर पेटवून आंदोलकांनी रस्ता अडवून धरला. त्यामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत होऊन दोन्ही बाजूने साधारणत: ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा फटका प्रवाशांना बसला.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाची धग : एक तास वाहतूक विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू असून कोंढाळी परिसरातील खापरी (बारोकर) फाटा येथे दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास रास्ता रोको करण्यात आले. टायर पेटवून आंदोलकांनी रस्ता अडवून धरला. त्यामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत होऊन दोन्ही बाजूने साधारणत: ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा फटका प्रवाशांना बसला.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर हिंसक पडसाद उमटत आहे. अनेक ठिकाणी रास्ता रोको, टायरची जाळपोळ, बसेसची तोडफोड केली जात आहे. आधी शांततेने असलेले हे आंदोलन आता चिघळण्याची चिन्हे दिसत आहे.आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी कोंढाळी परिसरातील मराठा समाजबांधव बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास खापरी (बारोकर) फाटा येथे एकवटले. बाळासाहेब जाधव, विजयसिंह रणनवरे, रणजित गायकवाड, रवी गुंड, सुजित बारोकर, अनिल बारोकर, हार्दिक अहिरराव, निखिल जाधव आदींच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत रस्ता अडविला. शासनाचा निषेध करीत ट्रॅक्टरचे दोन टायर पेटविले. त्यामुळे दोन्ही बाजूने येणारी वाहने जागेवर थांबली. कोंढाळी पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. आंदोलकांनी एकही वाहन पुढे जाऊ दिले नाही. असे असताना रुग्णवाहिकेला मात्र रस्ता मोकळा करून दिला, हे विशेष!दुपारी २ वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे ताफ्यासह आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून समजूत घातली. चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तब्बल तासभर चाललेल्या या रास्ता रोकोचा नागपूर - अमरावती ये-जा करणाऱ्या अनेकांना फटका बसला.याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलन