शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाच्या कार्यामध्ये देशभरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 22:54 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार ९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत संघाच्या कार्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुढील कार्यविस्तारावर या सभेत मंथन होईल. तत्पूर्वी, बुधवारी देशभरातून आलेल्या प्रांत प्रचारकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. दुपारभर चाललेल्या या बैठकीत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हेदेखील उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देप्रांत प्रचारकांच्या बैठकीत संघ कार्यविस्तारावर मंथनअ.भा.प्रतिनिधी सभा उद्यापासून पदाधिकारी, स्वयंसेवकांची चोख व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार ९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत संघाच्या कार्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुढील कार्यविस्तारावर या सभेत मंथन होईल. तत्पूर्वी, बुधवारी देशभरातून आलेल्या प्रांत प्रचारकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. दुपारभर चाललेल्या या बैठकीत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हेदेखील उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, देशभरातून जवळपास सर्व निमंत्रित प्रतिनिधी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले असून त्यांची परिसरात चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.दरवर्षी संघाची प्रतिनिधी सभा होत असते. परंतु तीन वर्षांनी ही सभा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नागपुरात होत असते. संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. यंदा होणाऱ्या  अखिल भारतीय सभेत संघाच्या कारभाराची धुरा सांभाळणाऱ्या  सरकार्यवाह या पदाची निवड होणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष यांच्यासह संघ परिवारातील ३५ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सभेत मांडण्यात येणाºया प्रस्तावांवर त्यांच्या उपस्थितीत चर्चा होईल. याचप्रमाणे विविध संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या कामाचा लेखाजोगा संक्षिप्तपणे मांडतील.अ.भा.प्रतिनिधी सभेसाठी सोमवारपासूनच बैठका सुरू झाल्या. बुधवारी प्रांत प्रचारकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. दुपारी दीडच्या सुमारास सुरू झालेली ही बैठक सायंकाळी साडेपाच नंतर संपली. या बैठकीला सरसंघचालकांसोबतच सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, इंद्रेश कुमार प्रामुख्याने सहभागी झाले होते. मागील तीन वर्षांतील संघविस्तार कार्याचा आढावा यात मांडण्यात आला. सोबतच भविष्यातील कार्यविस्तार उपक्रमांवरदेखील चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

१८ टक्क्यांनी वाढल्या शाखा

सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत मागील तीन वर्षात संघ विस्ताराच्या मुद्यांचा आढावा मांडण्यात आला. २०१५ ते २०१८ या कालावधीत संघाच्या शाखांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात दैनंदिन शाखा, साप्ताहिक मिलन व मासिक मिलन यांचा समावेश आहे.विमानतळ, रेल्वे स्थानकांवर नियोजनबद्ध स्वागतबुधवारीदेखील संघ परिवारातील विविध संघटनांचे पदाधिकारी संघभूमीत दाखल झाले. विमानतळ व रेल्वे स्थानकांवर निमंत्रितांचे स्वागत करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. संघाचे स्थानिक पदाधिकारी, स्वयंसेवक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी देखील धावपळ करताना दिसत होते. प्रत्येक निमंत्रिताची व्यवस्था कुठल्या वाहनात करण्यात आली आहे, रेशीमबागेत त्यांची निवासव्यवस्था कशी आहे, इथपासून ते अगदी त्यांच्या नोंदणीर्पयत सर्व माहिती त्यांना देण्यात येत होती. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील कार्यालयात सभा साहित्याचे वाटप सुरू होते.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर