शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

राष्ट्रीय लोक न्यायालयात दीड लाखावर प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:42 IST

गेल्या १४ जुलै रोजी देशभरातील विविध न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात झालेल्या लोक न्यायालयांमध्ये एकूण १ लाख ५५ हजार ६८८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यात १ लाख १७ हजार ४०५ दाखलपूर्व तर, ३८ हजार २८३ प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे. तसेच, यातून पीडित पक्षकारांना एकूण ४९३ कोटी ७९ लाख ८६ हजार २६६ रुपयांची भरपाई मिळाली आहे. लोक न्यायालयांत एकूण ७ लाख ७७ हजार ८१७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.

ठळक मुद्देराज्यातील आकडेवारी : पीडितांना मिळाली ४९३ कोटीची भरपाई

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या १४ जुलै रोजी देशभरातील विविध न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात झालेल्या लोक न्यायालयांमध्ये एकूण १ लाख ५५ हजार ६८८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यात १ लाख १७ हजार ४०५ दाखलपूर्व तर, ३८ हजार २८३ प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे. तसेच, यातून पीडित पक्षकारांना एकूण ४९३ कोटी ७९ लाख ८६ हजार २६६ रुपयांची भरपाई मिळाली आहे. लोक न्यायालयांत एकूण ७ लाख ७७ हजार ८१७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.सातारा जिल्ह्यात ८० हजार ८६७ पैकी २९ हजार ७०३, नाशिक जिल्ह्यात १ लाख २९ हजार १९३ पैकी २७ हजार ४७, पुणे जिल्ह्यात ६५ हजार १४७ पैकी २५ हजार ७६५, रायगड जिल्ह्यात ५७ हजार ७७४ पैकी १६ हजार ९२८, जळगाव जिल्ह्यात १ लाख २१ हजार ८३९ पैकी १६ हजार ६३७, नागपूर जिल्ह्यात ४४ हजार २०९ पैकी ६ हजार ७६९, मुंबई जिल्ह्यात २० हजार ५३५ पैकी ५ हजार ९१३, धुळे जिल्ह्यात १८ हजार ८४६ पैकी ४ हजार ८३९, ठाणे जिल्ह्यात २८ हजार ५७३ पैकी २ हजार १८३, यवतमाळ जिल्ह्यात ७ हजार ९५५ पैकी १ हजार ८३५, सांगली जिल्ह्यात २६ हजार २६२ पैकी १ हजार ७१६, भंडारा जिल्ह्यात ११ हजार २५२ पैकी १ हजार ६९१, बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ३५९ पैकी १ हजार ३८०, अहमदनगर जिल्ह्यात २२ हजार ८८२ पैकी १ हजार २५२, बिड जिल्ह्यात ६ हजार ६९१ पैकी १ हजार ७६, कोल्हापूर जिल्ह्यात ३१ हजार ४३ पैकी १ हजार ४५ तर, उस्मानाबाद जिल्ह्यात ८ हजार ४९१ पैकी १ हजार १० प्रकरणे निकाली निघाली. इतर जिल्ह्यात हजारापेक्षा कमी प्रकरणे निकाली निघाली.उच्च न्यायालयातील स्थितीमुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायपीठातील ७२९ पैकी ८१, नागपूर खंडपीठातील ४६० पैकी १७३ तर, औरंगाबाद खंडपीठातील ४३० पैकी ३५३ प्रकरणे निकाली निघाली. पीडितांना मुंबईमध्ये ४७ लाखावर, नागपूरमध्ये ७ कोटी ४८ लाखावर तर, औरंगाबादमध्ये २ कोटी ६ लाख रुपयांवर भरपाई मिळाली.

टॅग्स :Lokadalatलोकअदालतnagpurनागपूर