शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

रश्मी नांदेडकर यांची नागपुरात एसपी एसीबी म्हणून नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:07 IST

भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) उपायुक्त म्हणून भंडारा येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांची नियुक्ती झाली आहे.

ठळक मुद्देलवकरच स्वीकारणार पदभारपहिल्या महिला अधीक्षक म्हणून मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) उपायुक्त म्हणून नागपुरात भंडारा येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांची नियुक्ती झाली आहे. लवकरच त्या आपल्या पदाची जबाबदारी सांभाळणार असून, नागपूर एसीबीच्या अलीकडच्या कालावधीतील त्या पहिल्या महिला अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.नांदेडकर मूळच्या नांदुरा (जि. बुलडाणा) येथील रहिवासी होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण नांदुरा येथे तर उच्चशिक्षण अकोला आणि पुण्यात झाले आहे.स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची थेट भरतीनुसार २०११ मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस दलात नियुक्ती झाली. त्यांची पहिली नियुक्ती आकोटला होती. २०१४ मध्ये त्यांची आकोटमधून सहायक आयुक्त म्हणून नाशिक शहरात बदली झाली.२०१४ ते १६ पर्यंत त्या नाशिकमध्ये होत्या; नंतर ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांना पदोन्नती मिळाली आणि त्या भंडारा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या. आज त्यांना पदोन्नतीवर एसपी, नागपूर एसीबी म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. शांत मात्र स्वच्छ प्रतिमेच्या अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात.एसीबीतील महिला कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांमधील वाद भलत्याच वळणावर गेल्याने येथील मी टू प्रकरण चर्चेला आले. त्यामुळे नागपूर एसबीत अनेक धक्कादायक खुलासे झाले होते.नागपूर एसबीच्या एसपीची खुर्ची महिन्याला एक ते दीड कोटी रुपये गोळा करणारी असल्याचाही बोभाटाही झाला होता. त्यामुळे ही खुर्ची मिळावी म्हणून अनेक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, वरिष्ठांनी स्वच्छ प्रतिमेच्या अधिकारी म्हणून ओळख असलेल्या रश्मी नांदेडकर यांना ही जबाबदारी सोपविली आहे.

भ्रष्टाचार मुळासह उपटून काढूआपण लवकरच पदाची सूत्रे स्वीकारणार आहोत. काही दिवस अभ्यास केल्यानंतर भ्रष्टाचाराविरुद्धची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवू आणि सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या जास्तीतजास्त भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करू, असे मत त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :Policeपोलिस