शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत ९ वर्षाच्या मुलावर दुर्मिळ शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 21:35 IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘युरोलॉजी’ विभागाचे प्रमुख धनंजय सेलुकर यांनी ९ वर्षाच्या मुलावर ‘लॅप्रोस्कोपी असिस्टेड पेडियाट्रिक पीसीएनएल’ करण्याचा निर्णय घेतला. अनुभव व कौशल्याच्या बळावर ही दुर्मिळ शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केली.

ठळक मुद्दे‘सुपर’च्या युरोलॉजी विभागाचा पुढाकारपहिल्यांदाच ‘लॅप्रोस्कोपी असिस्टेड पेडियाट्रिक पीसीएनएल’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकच मूत्रपिंड, आतड्यांच्या मागे तेही मूत्राशयाच्यावर. मूत्रपिंडाच्या आत २२ एमएमचा खडा. ‘क्रिएटिनिन’चा स्तर १४वर पोहचलेला. जीवघेण्या वेदनेने ९ वर्षाचा मुलगा अर्धमेला झालेला. अशा रुग्णावर शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. परंतु रुग्णाची स्थिती पाहता शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘युरोलॉजी’ विभागाचे प्रमुख धनंजय सेलुकर यांनी ‘लॅप्रोस्कोपी असिस्टेड पेडियाट्रिक पीसीएनएल’ करण्याचा निर्णय घेतला. अनुभव व कौशल्याच्या बळावर ही दुर्मिळ शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केली. चिमुकल्याला नवे जीवन मिळाले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधीलच नाही तर मध्यभारतातील ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे.रवींद्र लक्ष्मण पटले (९) रा. वर्धा, त्या रुग्णाचे नाव. जानेवारी महिन्यात अचानक त्याला उलट्या होऊन पोटात दुखायला लागले. आई-वडिलांनी तातडीने स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांंनी सावंगी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. येथील डॉक्टरांनी तपासून येथे या स्वरुपातील शस्त्रक्रिया होत नसल्याचे सांगितले. रुग्णाला नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्लाही दिला. रवींद्रला नागपूर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने सलग १८ दिवस अतिदक्षता विभाग उपचार करण्यात आले. २० जानेवारी रोजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागात पाठविण्यात आले. येथील डॉ. सेलुकर यांनी त्याची तपासणी केली. मूत्रपिंडात खडा असल्याने ते ‘ब्लॉक’ झाले होते. ‘क्रिएटीनिन’चा स्तर १४वर गेला होता. मूत्रपिंडावर सूजही होती. काही दिवस वॉर्डात भरती करून क्रिएटीनिनचा स्तर व सूज कमी करण्यात आली. डॉ. सेलुकर म्हणाले, अशा रुग्णावर शस्त्रक्रिया हाच पर्याय राहतो. परंतु रुग्णाची स्थिती पाहता शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत वाढण्याचा धोका होता. दुसरे म्हणजे ‘लॅप्रोस्कोपी असिस्टेड पीसीएनएल’ ही उपचारपद्धती आतापर्यंत मोठ्यांमध्येच केली जात होती. परंतु रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन ‘लॅप्रोस्कोपी असिस्टेड पेडियाट्रिक पीसीएनएल’ करण्याचा निर्णय घेतला.

आतड्यांना बाजूला सारून केली शस्त्रक्रियाडॉ. सेलुकर म्हणाले, सामान्यत: मूत्रपिंड हे कंबरेत असते. परंतु या रुग्णामध्ये एकच मूत्रपिंड आणि ते मूत्राशयावर होते. यातही ते आतड्यांच्या मागे होते. यामुळे ‘लॅप्रोस्कोपी असिस्टेड पेडियाट्रिक पीसीएनएल’ करणेही जोखमीचे होते. रुग्णाच्या कंबरेत एक छोटे छिद्र करण्यात आले. आतड्या बाजूला करीत दुर्बीण आत सोडण्यात आली. मूत्रपिंडातील खड्यावर लेझरचा मारा करण्यात आला. अनुभव व कौशल्याच्या बळावर ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. विभागात लहान मुलावर केलेली ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचेही ते म्हणाले.

डॉक्टरांच्या या चमूने घेतले विशेष परिश्रम‘लॅप्रोस्कोपी असिस्टेड पेडियाट्रिक पीसीएनएल’ला यशस्वी करण्यासाठी डॉ. धनंजय सेलुकर, डॉ. कुणाल मेश्राम, डॉ. प्रसाद उपलंगावार, डॉ. निकेत जैन, डॉ. प्रतीक लढ्ढा, डॉ. ऋषीकेश, डॉ. रजत, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. वली, डॉ. प्रसाद व डॉ. आशुतोष जयस्वाल, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :Healthआरोग्य