शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात आढळले दुर्मीळ पाणमांजर  : पहिलीच फोटोग्राफिक नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:51 IST

स्मूथ कोटेड ऑटर (पाणमांजर) या प्राण्याची विदर्भात नुकतीच नोंद झाली असून या प्राण्याचे छायाचित्र प्रथमच मिळाले आहे.

ठळक मुद्देअमरावतीच्या वन्यजीव अभ्यासकांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मूथ कोटेड ऑटर (पाणमांजर) या प्राण्याची विदर्भात नुकतीच नोंद झाली असून या प्राण्याचे छायाचित्र प्रथमच मिळाले आहे. अमरावती येथील वाईल्डलाईफ अँड एनव्हायर्मेंट कन्झर्व्हेशन सोसायटीचे (वेक्स) सदस्य आणि वन्यजीव छायाचित्रकार लतीश डेकाटे आणि वन्यजीव अभ्यासक अंकित बाकडे यांना चंद्रपूर जिल्ह्यातील एका नदीपात्रात नियमित पक्षी अभ्यासादरम्यान हा प्राणी आढळून आला. त्याची छायाचित्रे घेण्यात लतीश डेकाटे यांना यश आले आहे.डब्ल्यूसीटीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत वडतकर आणि वाईल्डलाईफ कन्झर्व्हेशन ट्रस्टचे आदित्य जोशी यांनी या प्राण्याची छायाचित्रे पाहिल्यावर तो स्मूथ कोटेड ऑटर असल्याचे निश्चित केले. स्थानिक भाषेत या प्राण्याला पाणमांजर किंवा हुदळे नावाने ओळखल्या जाते. ही प्रजाती धोकाग्रस्त श्रेणीमध्ये समाविष्ट असून विदर्भात पूर्वी मोठ्या नद्यांमध्ये आढळत होती. अलीकडे कुठेच सापडत नसल्याची माहिती आहे.भारतात दुर्मीळ असलेल्या प्राण्याच्या अंगावर करड्या रंगाचा मऊशार केसांचा कोट आणि जबड्याचा खालील भागापासून गळ्यापर्यंतचा पांढरा रंग यामुळे ही प्रजाती सहज ओळखता येते. नाकावरच्या इंग्रजी व्ही प्रमाणे रंगाच्या खुणेमुळेसुद्धा त्याला ओळखणे सोपे असते.जलप्रदूषणाचे पाणमांजरावर संकटविदर्भातील तापी, वैनगंगा, इंद्रावती अशा काही मोठ्या नद्यांमध्ये फार पूर्वी पाणमांजर या दुर्मीळ जलचर सस्तन प्राण्यांचे अस्तित्व होते. मात्र अलीकडे नद्या कोरड्या पडल्यामुळे आणि जलप्रदूषणामुळे हा जलचर प्राणी अतिशय दुर्मीळ झाला आहे. अलीकडे विदर्भात कुठेच या प्राण्याची नोंद आढळून आली नव्हती. अतिशय लाजाळू असलेल्या या प्राण्याचे छायाचित्रसुद्धा अलीकडे मिळालेले नसल्याने त्यास अतिशय दुर्मीळ समजले जात आहे.देशात तीन जातीआपल्या देशात या पाणमांजरांच्या स्मूथ कोटेड ऑटर, आशियन स्माँल क्लाँ ऑटर आणि युरेशियन ऑटर या तीन प्रजाती आढळतात. यापैकी मध्य भारतात स्मूथ कोटेड ऑटर या प्रजातीचाच आढळ आहे. युरेशियन ऑटर या प्रजातीची अलीकडेच मध्य प्रदेशात नोंद झाली आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ