शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  चाकूच्या धाकावर दोन चिमुकल्यांवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:33 IST

चार व सहा वर्षाच्या चिमुकल्यांना चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची संतापजनक घटना लकडगंज परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली. आरोपी फरार असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापासह दहशत पसरली आहे.

ठळक मुद्देआरोपी फरार : लकडगंज परिसरातील पालकांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार व सहा वर्षाच्या चिमुकल्यांना चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची संतापजनक घटना लकडगंज परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली. आरोपी फरार असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापासह दहशत पसरली आहे.मिनिमातानगर येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सहा वर्षाची एक चिमुकली शेजारी राहणाऱ्या चार वर्षाच्या चिमुकलीसोबत घरासमोर खेळत होती. दरम्यान एक अनोळखी आरोपी तिथे आला. त्याने दोन्ही मुलींजवळ येऊन त्यांना घरी सोडून देतो असे सांगितले. यावर मोठ्या मुलीने नकार दिला. तेव्हा आरोपीने लहान मुलीला कडेवर घेतले आणि तिचा लाड करू लागला. तेव्हा मोठी मुलगीही त्याचा हात धरून त्याच्यासोबत निघाली. आरोपीने दोन्ही मुलींना मिनिमातानगरच्या रेल्वे लाईनजवळ असलेल्या हल्दीराम फॅक्टरीच्या मागच्या निर्जन स्थळी नेले. तिथे चाकूचा धाक दाखवून दोन्ही मुलींवर बलात्कार केला आणि फरार झाला. या घटनेनंतर दोन्ही मुली हातात कपडे पकडून भटकत होत्या. एका मजुराचे मुलींकडे लक्ष गेले. मुलींच्या कपड्यावर रक्ताचे डाग पाहून त्याला संशय आला. त्याने दोन्ही मुलींना विचारपूस करून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले. मुलींच्या कुटुंबीयांनी लगेच लकडगंज पोलिसांना सूचना दिली. यानंतर आरोपीविरुद्ध बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.घरासमोरही मुले सुरक्षित नाहीया घटनेनंतर घरासमोर खेळत असलेली मुलेही सुरक्षित नसल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. लकडगंज परिसरातील पालकांमध्ये संतापासह दहशतीचे वातावरण आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार