शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सव्वाचार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:56 IST

सव्वाचार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अंबाझरी पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे परिसरात संताप निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देआरोपी गजाआड : अंबाझरीतील संतापजनक घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सव्वाचार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अंबाझरी पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे परिसरात संताप निर्माण झाला आहे. समीर मुनीर शेख (वय ३०) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.आरोपी समीर आणि पीडित मुलीचा परिवार अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजूबाजूला राहतो. आरोपी काहीसा मनोरुग्णासारखा वागतो. त्यामुळे लग्नाच्या काही दिवसानंतर त्याची पत्नी त्याला सोडून गेली. सध्या तो त्याची आई आणि एका गतिमंद भावासोबत राहतो. पीडित मुलीला तो आपल्या घरी कार्टून बघण्याच्या बहाण्याने नेत होता. मुलगी केवळ चार वर्षे तीन महिने वयाची आहे. त्यामुळे तिच्या आईला कधीच संशय आला नाही. १ मे रोजी आरोपी समीरने तिला घरी नेले. परत आल्याच्या दोन दिवसांनंतर मुलीला वेदना होऊ लागल्याने आईने तिला विचारणा केली. अंघोळीच्या वेळी पाहणी केली असता आईला संशय आला. चिमुकलीला विचारणा केली असता तिने आरोपी समीरच्या पापाची संकेतातून वाच्यता केली. त्यामुळे आईने नराधम समीरला विचारणा केली. यावेळी त्याने याबाबत कुठे वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या दोन्ही मुलांना ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यामुळे भीतीने महिला गप्प बसली. बुधवारी सायंकाळी आरोपीने पुन्हा मुलीला सोबत नेण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आईने त्याला विरोध केला असता त्याने मुलीच्या आईला अश्लील शिवीगाळ केली. आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाले. त्यांना महिलेने घडलेला प्रकार सांगितला. आजूबाजूच्यांनी धीर देऊन पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शुक्रवारी पीडित महिलेने तक्रार नोंदविली. अंबाझरीतील पोलीस उपनिरीक्षक एस. एस. ठाकरे यांनी गुन्हा दाखल केला.पाच दिवसांचा पीसीआरपोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. महिला पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी लगेच धावपळ करून आरोपी समीर शेखला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून त्याची पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळविली. पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार