लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एमआयडीसी येथे एका अल्पवयीन आरोपीने भाड्याने राहणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. गेल्या २४ तासात अत्याचारासह तीन मुलींचा विनयभंगही करण्यात आला आहे.आठ वर्षाच्या मुलीवरील अत्याचाराचा हा प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू होता. पीडित मुलीचे आई-वडील आरोपी १६ वर्षीय मुलाच्या घरी भाड्याने राहतात. आई-वडील कामावर निघून गेल्यानंतर पीडित मुलगी व तिचा लहान भाऊ घरी राहतात. आरोपी अल्पवयीन दहावीचा विद्यार्थी आहे. त्याचे मुलीच्या घरी येणे-जाणे होते. तो एक महिन्यापासून मुलीवर अत्याचार करीत होता. तिला याबाबत काहीच कळत नव्हते. तिला खूप त्रास होऊ लागला तेव्हा १८ मे रोजी तिने आपल्या आईला सांगितले. आईने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तपासले असता खरा प्रकार लक्षात आला. आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले.अजनी येथील रहिवासी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी १९ मे रोजी सकाळी आपल्या घरी एकटी होती. त्याचवेळी वस्तीत राहणारा १८ वर्षीय आरोपी आकाश कुशवाह तिच्या घरी आला आणि दरवाजा बंद करून तिचा विनयभंग केला. त्याचप्रकारे हुडकेश्वर येथील रहिवासी १० वर्षीय मुलगी २० मे रोजी रात्री घरी एकटी होती. २४ वर्षीय आरोपी पिंटू शहाणे हा पाणी मागण्याच्या बहाण्याने घरी आला आणि तिच्याशी आपत्तीजनक व्यवहार केला. मुलीने आरडाओरड केल्यावर तो पळून गेला. नंदनवन येथील रहिवासी २२ वर्षीय तरुणी २० मे रोजी सायंकाळी तिच्या घरीच २६ वर्षीय नातेसंबंधातील आरोपी पप्पू सनोडियाने विनयभंग केला.
नागपुरात आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:02 IST
एमआयडीसी येथे एका अल्पवयीन आरोपीने भाड्याने राहणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. गेल्या २४ तासात अत्याचारासह तीन मुलींचा विनयभंगही करण्यात आला आहे.
नागपुरात आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार
ठळक मुद्देअल्पवयीन आरोपीचे कृत्य : २४ तासात एकावर बलात्कार, तिघांचा विनयभंग