शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बिर्याणी खाऊ घालून नागपुरात तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:37 IST

ओळखीच्या तरुणीला (वय २५) गुंगीचे औषधयुक्त बिर्याणी खाऊ घालून आरोपी मनोज बावनेर (वय २७, रा. केजीएन सोसायटी, गिट्टीखदान) याने बलात्कार केला.

ठळक मुद्देगिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओळखीच्या तरुणीला (वय २५) गुंगीचे औषधयुक्त बिर्याणी खाऊ घालून आरोपी मनोज बावनेर (वय २७, रा. केजीएन सोसायटी, गिट्टीखदान) याने बलात्कार केला. त्यानंतर माफी मागण्याच्या बहाण्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला आणि लग्नाचे आमिष दाखवून तिला गप्प केल्यानंतर आता आरोपीने लग्नास नकार दिला.पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, २ डिसेंबर २०१७ ला रात्री ८.३० च्या सुमारास तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी मनोज तिच्या घरात आला. तिला बिर्याणी आणून खाऊ असे तो म्हणाला. तिने होकार दिल्यानंतर मनोजने बाहेरून बिर्याणी आणली. ती खाल्ल्यानंतर तिची शुद्ध हरपली. त्याअवस्थेत मनोजने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दुसऱ्या  दिवशी पुन्हा मनोज तिच्या घरी माफी मागण्याच्या बहाण्याने गेला. यावेळी ती शांत असल्याचे पाहून त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. तिने पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्यामुळे त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शांत केले. त्यानंतर तो तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध जोडू लागला. ती आता गर्भवती झाली. तिने मनोजला हे सांगून तातडीने लग्न करू असे म्हटले. मात्र, आरोपीने तिला लग्नास नकार देऊन वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरुणीने गिट्टीखदान ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदवली.आरोपी गजाआडपोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपी मनोजला अटक करण्यात आली आहे. तो खासगी नोकरी करतो.

टॅग्स :nagpurनागपूरRapeबलात्कार