शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात त्रिपुरातील महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:00 IST

पोलीस स्टेशन दाखवतो, असे सांगून एका आरोपीने त्रिपुरा येथून नागपुरात आलेल्या महिलेला रेल्वेस्थानकाजवळच्या झुडपात नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

ठळक मुद्देपोलीस ठाणे दाखवण्याची बतावणी : झुडपात नेऊन केला बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस स्टेशन दाखवतो, असे सांगून एका आरोपीने त्रिपुरा येथून नागपुरात आलेल्या महिलेला रेल्वेस्थानकाजवळच्या झुडपात नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.मूळची त्रिपुरा येथील रहिवासी असलेली ३० वर्षीय महिला कोईम्बतूर येथे नोकरी करते. ती तिच्या सागर आणि ज्योती नामक मैत्रिणीसह गुरुवारी मध्यरात्री नागपुरात आली. ते दोघे इंदोरला असतात. सागर आणि ज्योतीने पीडित महिलेला रेल्वेस्थानकावर सोडून ते त्यांच्या गावाला निघून गेले. मध्यरात्री १ वाजता महिलेला कोणते काम पडले कळायला मार्ग नाही. तिने तेथे बसलेल्या एका ४० ते ४५ वयोगटातील व्यक्तीला पोलीस ठाण्याचा पत्ता विचारला. त्याने तिला पोलीस ठाणे दाखवतो, असे म्हणून रेल्वेस्थानकाबाहेर आणले आणि बाजूच्या झुडपात नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला. त्यानंतर काही वेळाने आरोपीने तिला बाजूच्या एका लॉजमध्ये नेऊन पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित महिलेला सोडून दिले. ती रेल्वेस्थानकाजवळच्या मेट्रोच्या बूथजवळ संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे पाहून मेट्रोच्या गार्डने तिला वाहतूक शाखेच्या पोलीस कार्यालयाजवळ आणले. तिने तेथे आपबिती सांगितल्यानंतर तेथून त्यांनी गणेशपेठ ठाण्यात फोन करून बलात्काराची माहिती दिली. त्यानंतर गणेशपेठच्या पोलीस पथकाने तिला शुक्रवारी पहाटे ठाण्यात आणले. एका आरोपीने पोलीस ठाण्याचा पत्ता सांगतो, असे म्हणून एकदा झुडपात तर दुसऱ्यांदा लॉजवर बलात्कार केल्याचे सांगताच पोलीस हादरले. त्यांनी वैद्यकीय तपासणी आणि अन्य औपचारिकता पार पाडल्यानंतर गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल होण्यास विलंबपीडित महिलेचा पती लष्करात असल्याचे सांगितले जाते. तिला भाषेची समस्या असल्याने पोलिसांना आरोपी आणि घटनाक्रम समजून घेण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. त्यामुळे घटनेच्या २४ तासानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला.आरोपी सीसीटीव्हीत कैदया प्रकरणातील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तो महिलेला सोबत नेताना दिसतो आहे. त्या आधारे गणेशपेठ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, ती पोलीस ठाण्यात कशासाठी जात होती, ते स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार