शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 21:49 IST

१७ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर सतत तीन दिवस शारीरिक संबंध जोडले. नंतर तिला घरून पळून जाऊ, असे म्हणत स्वत:चे कपडे व साहित्य घेऊन बोलविले. स्वत: मात्र नमूद ठिकाणी आलाच नाही. परिणामी नागरिकांच्या मदतीने युवतीने पोलीस ठाणे गाठून आरोपी वैभव विलास तुपटे (वय २३) विरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली.

ठळक मुद्देघरून पळून जाण्यासाठी बोलविले : स्वत: बेपत्ता झालागिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १७ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर सतत तीन दिवस शारीरिक संबंध जोडले. नंतर तिला घरून पळून जाऊ, असे म्हणत स्वत:चे कपडे व साहित्य घेऊन बोलविले. स्वत: मात्र नमूद ठिकाणी आलाच नाही. परिणामी नागरिकांच्या मदतीने युवतीने पोलीस ठाणे गाठून आरोपी वैभव विलास तुपटे (वय २३) विरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली.आरोपी तुपटे हा मूळचा बेळगाव, ता. ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) येथील रहिवासी आहे. तो दाभा परिसरात एका कामावर रोजमजुरी करतो. पीडित युवतीची आईदेखील त्याच ठिकाणी काम करते. त्यामुळे युवतीच्या आईसोबत त्याची ओळख आहे. त्यातून तो चार दिवसांपूर्वी युवतीच्या घरी आला. तिच्या आईसोबत बोलता बोलता त्याने आपला मोबाईल नंबर एका कागदावर लिहून तो कागद युवतीला दिला. सायंकाळी फोन कर, असे तो म्हणाला. त्यानुसार, १३ नोव्हेंबरला सायंकाळी युवतीने तुपटेला फोन केला. त्याने तिला दाभा परिसरात एका ठिकाणी भेटायला बोलविले. तेथे युवती पोहचल्यावर त्याने तिला प्रपोज केले. मला तू खूप आवडते, तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून त्याने तिचा होकार मिळवला. त्यानंतर तिला अंधाऱ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शरीरसंबंध जोडले. ती जाळ्यात अडकल्याची खात्री पटल्याने आरोपीने पुढचे तीन दिवस तिच्यावर ठिकठिकाणी नेऊन बलात्कार केला. गुरुवारी त्याने तिला मित्राच्या फ्लॅटवर नेले. तेथे तिच्यावर त्याने बलात्कार केला. यावेळी युवतीने त्याला विरोध करून लग्नाबाबत विचारले असता त्याने तिला ‘तू तुझे कपडे घरून घेऊन ये, आपण पळून जाऊन लग्न करू’ , असे म्हटले. त्याच्यावर विश्वास ठेवून युवतीने तिचे कपडे व आवश्यक चीजवस्तू सोबत घेतल्या. ती आरोपी तुपटेने बोलविल्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी वाडीतील सोनबानगर चौकात पोहचली. सायंकाळ झाली तरी आरोपी तिला घ्यायला आला नाही. त्यामुळे तिने त्याच्या मोबाईलवर संपर्क केला. यावेळी त्याने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा युवतीचे अवसान गळाले. ती जोरजोरात रडू लागली. त्यामुळे बाजूची मंडळी गोळा झाली. त्यांनी तिला धीर देत विचारपूस केली असता तिने त्यांना आपबिती सांगितली.नागरिकांनी तिला वाडी पोलिसांकडे पोहचवले. वाडी पोलिसांनी घटनाक्रम गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीतील असल्याचे सांगून तिला तिकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, युवतीने शुक्रवारी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी तुपटेविरुद्ध बलात्काराचे कलम ३७६ (२) तसेच पोक्सो कायद्यानुसार सहकलम ४, ८ अन्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार