शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 23:54 IST

बेंगळुरुमधून नागपुरात रोजगाराच्या शोधात आलेल्या बालाघाटच्या एका महिलेला चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तीन महिन्यांपासून शरीरसंबंध प्रस्थापित करूनही त्याने नोकरी मिळवून दिली नाही. उलट तो आता मारहाण करून धमकी देऊ लागल्याने महिलेने तिच्या मूळगावी बालाघाटमध्ये त्याच्याविरुध्द बलात्काराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तेथे गुन्हा दाखल करून हे प्रकरण तपासासाठी एमआयडीसी पोलिसांकडे पाठविले आहे.

ठळक मुद्देबालाघाटच्या महिलेची तक्रार : एमआयडीसी पोलिसांकडून शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेंगळुरुमधून नागपुरात रोजगाराच्या शोधात आलेल्या बालाघाटच्या एका महिलेला चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तीन महिन्यांपासून शरीरसंबंध प्रस्थापित करूनही त्याने नोकरी मिळवून दिली नाही. उलट तो आता मारहाण करून धमकी देऊ लागल्याने महिलेने तिच्या मूळगावी बालाघाटमध्ये त्याच्याविरुध्द बलात्काराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तेथे गुन्हा दाखल करून हे प्रकरण तपासासाठी एमआयडीसी पोलिसांकडे पाठविले आहे.बलात्काराचा आरोप करणारी महिला ३५ वर्षांची आहे. ती मूळची बालाघाट (मध्य प्रदेश) मधील रहिवासी आहे. तिला एक मुलगा देखिल आहे. चांगल्या रोजगाराच्या शोधात ती बेंगळुरुला गेली होती. तेथे प्रशिक्षण घेऊनही मनासारखा पगार मिळत नसल्याने ती आॅगस्ट २०१८ मध्ये नागपुरात आली. येथे ती नोकरीच्या शोधात असताना एमआयडीसीतील राजेंद्र आचरे नामक आरोपीसोबत तिचा संपर्क आला. त्याने तिला चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर १८ आॅगस्टपासून तो तिच्याशी नोकरीचे आमिष दाखवून नियमित शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला. तब्बल तीन महिने झाले तरी तो नोकरी लावून देण्याचे नाव घेत नसल्याने तिने ७ नोव्हेंबरला त्याला शरीरसंबंधास नकार दिला. यानंतर ती आपल्या गावाला निघून गेली. तिचा पत्ता माहीत असल्यामुळे आरोपी आचरे तिच्या बालाघाटमधील घरी गेला आणि तिच्यावर नागपुरात परत चलण्यासाठी दबाव निर्माण करू लागला. तिने नकार दिल्यामुळे त्याने तिला मारहाण करून धमकी दिली. परिणामी महिलेने बालाघाट पोलिसांकडे आचरेविरुद्ध तक्रार नोंदवली. नोकरीचे आमिष दाखवून त्याने तीन महिन्यात अनेकदा बलात्कार केला. आता आरोपीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे तिने तक्रारीत नमूद केले. त्यामुळे बालाघाट पोलिसांनी शून्य (झिरो) क्राईमनुसार गुन्हा दाखल केला. मात्र, प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे बालाघाट पोलिसांनी बुधवारी हे प्रकरण तपासासाठी नागपूर पोलिसांना पाठविले. त्यानुसार, आता एमआयडीसी पोलीस आरोपी आचरेचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार