शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 20:57 IST

मोबाईल टॉवरच्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ आॅगस्टच्या दुपारी हा गुन्हा घडला.

ठळक मुद्देलग्नास नकार : नंदनवनमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईल टॉवरच्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ आॅगस्टच्या दुपारी हा गुन्हा घडला.आरोपीचे नाव राहुल ठाकरे (वय २५) आहे. तो वाठोड्यात राहतो. आपण मोबाईल टॉवर कंपनीत अधिकारी असून, तरुणींना नोकरी लावून देऊ शकतो, असे सांगून ११ आॅगस्टला पीडित तरुणीच्या (वय २०) घरी गेला. तेथे त्याने तरुणीच्या आईचा विश्वास संपादन करून तरुणीला लगेच नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे आईने त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीला कागदपत्रे घेऊन ११ आॅगस्टला त्याच्या दुचाकीवर बसवून त्याच्या आॅफिसला पाठविले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १२ आॅगस्टला तो पुन्हा तिच्या घरी आला. त्याने पुन्हा तरुणीला आपल्या दुचाकीवर बसवून चांदमारी परिसरात नेले. तेथे एका मित्राच्या खोलीवर नेऊन तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकीही दिली. तरुणीने घरी परत आल्यानंतर तिने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. आईने आरोपीला फोनवर विचारणा केली असता, त्याने आपण एकाच जातीचे आहोत असे सांगून, तरुणीसोबत लग्न करण्याची तयारी दाखविली. बदनामी आणि मुलीच्या भविष्याचा विचार करून महिलेने झाले गेले विसरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता महिलेने आरोपी राहुल ठाकरेला लग्नाबद्दल विचारणा केली असता, त्याने स्पष्ट नकार देऊन तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, असे म्हटले. त्यामुळे महिला आणि तिची मुलगी नंदनवन ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी पोहोचली. ठाणेदार विनायक चव्हाण यांनी मुलीची तक्रार ऐकून घेतल्यानंतर आरोपी राहुल ठाकरेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.पत्ता खोटा सांगितला?आरोपी राहुलने मुलीच्या आईला दिलेल्या पत्त्यावर पोलीस पोहोचले असता, तो तेथे आढळला नाही. त्याने त्याचा राहण्याचा पत्ताही खोटा सांगितल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कार