शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नागपुरात शाळकरी मुलीवर बलात्कार : मोबाईलमध्ये व्हिडिओ बनविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 21:38 IST

मैत्रिणीच्या घरून निघालेल्या एका शाळकरी मुलीला (वय १४) जबरदस्तीने बाजूच्या टॉयलेटमध्ये नेऊन एका आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे विवस्त्रावस्थेचे मोबाईलमध्ये शुटिंग केले. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.

ठळक मुद्देशेजारी तरुणाचे कुकृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मैत्रिणीच्या घरून निघालेल्या एका शाळकरी मुलीला (वय १४) जबरदस्तीने बाजूच्या टॉयलेटमध्ये नेऊन एका आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे विवस्त्रावस्थेचे मोबाईलमध्ये शुटिंग केले. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. या प्रकरणी राकेश हरीश शाहू (वय २३, रा.धरमपेठ,गवळीपुरा) नामक आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.आरोपी शाहू सीताबर्डीत हातठेला लावतो. त्याला दारूचे व्यसन आहे. त्याच्या मोहल्ल्यातच पीडित मुलगी राहते. ती नवव्या वर्गात शिकते. तिचे आईवडील हातमजुरी करतात. गेल्या काही दिवसांपासून आरोपी राकेश हा तिच्यावर वाईट नजर ठेवून होता. तोतिचा पाठलाग करत होता. ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे तो तिला रस्त्यात गाठून अश्लील टोमणे मारायचा.२५ एप्रिलला रात्री ८ वाजता पीडित मुलगी बाजूला राहणाऱ्या एका मैत्रिणीच्या घरी गेली. त्यावेळी राकेश तिच्या मागावर होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास ती घरी परतत असताना राकेशने तिला अडविले. तिला बळजबरीने एका निर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर नेले. तेथील बाथरूममध्ये तिच्यावर बलात्कार केला. या नराधमाने शारीरिक संबंधाची मोबाईलमध्ये व्हिडिओ क्लीपही बनविली. तिचे विवस्त्रावस्थेतील फोटोही काढले आणि ते व्हायरल करण्याचा धाक दाखवला. या गुन्ह्याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशीही धमकी दिली.आईमुळे झाला गुन्हा दाखलजीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे तसेच बदनामीचा धाक दाखविल्यामुळे पीडित मुलीने चार ते पाच दिवस कुणालाच काही सांगितले नाही. ती तणावात असल्याची बाब आईच्या लक्षात आली. आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. आईने तिला सीताबर्डी ठाण्यात नेले. पोलिसांनी लगेच बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी राकेश शाहूला अटक केली.लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंधसक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडित ३३ वर्षीय महिला पतीपासून विभक्त झाली. तिची आरोपी प्रकाश हटवारी लाडे याच्याशी दोन वर्षांपूर्वी ओळझ झाली होती. आरोपी मूळचा ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) जवळच्या सायगाव येथील रहिवासी आहे. तो एका इस्पितळात आणि पीडित महिला दुसऱ्या ठिकाणी परिचारिकेचे काम करते. त्यांच्यात दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध जोडले. त्याने तिच्या आईवडिलांकडून ३७ हजार रुपयेही नेले. आता मात्र लग्नास नकार दिला. त्याने बलात्कार आणि फसवणूक केल्याची तक्रार पीडित महिलेने नोंदवली. त्यावरून बुधवारी सक्करदरा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न : आरोपीकडून चावा घेऊन पळचाकूचा धाक दाखवूनही न डगमगता तीव्र विरोध करून बलात्काराचा प्रयत्न हाणून पाडल्यामुळे एका नराधमाने १७ वर्षीय युवतीच्या हाताला कडाडून चावा घेतला आणि अश्लील शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मंगळवारी मध्यरात्री शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी आरोपी राकेश नंदलाल चव्हाण (वय २७, रा. मुदलियार चौक, शांतिनगर) याला शांतिनगर पोलिसांनी अटक केली आहे.आरोपी राकेश पीडित युवतीचा नातेवाईक आहे. तो तिच्यावर अनेक दिवसांपासून वाईट नजर ठेवून होता. मंगळवारी मध्यरात्री ती तिच्या घराच्या रूममध्ये एकटीच झोपली असल्याचे पाहून आरोपी राकेश तिच्या रूममध्ये शिरला. त्याने तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. युवतीने त्याचा तीव्र विरोध केला. मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे राकेशने तिच्या हाताला कडाडून चावा घेतला आणि चाकू समोर करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेला. युवतीने या प्रकरणाची शांतिनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. जाताना त्याने पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारेन, अशीही धमकी दिली. युवतीने बुधवारी सकाळी या प्रकरणाची तक्रार शांतिनगर ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी राकेशला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Rapeबलात्कारStudentविद्यार्थी