शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या हुडकेश्वरमधील शाळकरी मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:11 IST

शाळकरी मुलीला (वय १५) नातेवाईकांच्या भेटीला नेतो, असे सांगून कारंजा लाडमध्ये राहणाऱ्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. १७ ते २१ मे दरम्यान हा गुन्हा घडला. ईश्वर विजय दोडके (वय २०) असे आरोपीचे नाव असून तो वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी आहे.

ठळक मुद्देआरोपी कॅटर्सचे काम करणारा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - शाळकरी मुलीला (वय १५) नातेवाईकांच्या भेटीला नेतो, असे सांगून कारंजा लाडमध्ये राहणाऱ्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. १७ ते २१ मे दरम्यान हा गुन्हा घडला. ईश्वर विजय दोडके (वय २०) असे आरोपीचे नाव असून तो वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी आहे. नागपुरात तो कॅटरर्सचे काम करतो. तो हुडकेश्वरमध्ये भाड्याने राहत होता. पीडित मुलीचे नातेवाईक त्याच्या कारंजा येथील घराजवळ राहतात. त्यामुळे त्याची पीडित मुलगी आणि तिच्या आईवडिलांसोबत ओळख आहे. यातून त्याचे पीडित मुलीच्या घरी जाणे-येणे होते. त्याने मुलीच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केल्यानंतर मुलीला नातेवाईकांच्या घरी भेटीसाठी नेतो म्हणून १७ मे रोजी सकाळी ७ वाजता आपल्या सोबत नागपूरहून कारंजाला नेले. तेथे त्याने मुलीला धाक दाखवून तिच्यावर २१ मेपर्यंत वारंवार बलात्कार केला. त्यानंतर त्याने मुलीच्या नातेवाईकांची भेट न घालवून देताच तिला यवतमाळ येथे नेऊन सोडले. पीडित मुलगी तेथून आपल्या घरी कशीबशी नागपुरात पोहचली. येथे आल्यानंतर मुलीने आरोपीकडून झालेल्या अत्याचाराची माहिती आईवडिलांना दिली. त्यामुळे मुलीच्या आईवडिलांनी आरोपी दोडकेला विचारणा केली. दोडकेने त्यांच्याशी वाद घालून त्यांना अश्लील शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पीडित मुलीने या प्रकरणाची तक्रार हुडकेश्वर ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी बलात्कार, तसेच पोक्सो कायद्याच्या कलमान्वये आरोपी दोडकेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर