शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 00:52 IST

वर्षभरापासून शरीरसंबंध जोडणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला.

ठळक मुद्देवर्षभरापासून अनेकदा शरीरसंबंध : जरीपटक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्षभरापासून शरीरसंबंध जोडणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला. प्रियकराच्या आईवडिलांनीही यापूर्वी लग्नास होकार देऊन आता नकार दिल्याने त्यांचेही नाव तक्रारकर्त्या तरुणीने जरीपटका पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नोंदवले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले.तक्रार करणारी तरुणी २७ वर्षांची आहे. ती जरीपटक्यात राहते. आरोपी कुणाल किशोर सावरकर हा पॉवर ग्रीड चौकाजवळ राहतो. तो आणि तरुणी एका रिक्रूटमेंट कंपनीत काम करायचे. त्यामुळे कुणालसोबत तिचा संपर्क होता. तो मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतरित झाला. तिच्या तक्रारीनुसार, कुणालने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत १ सप्टेंबर २०१८ पासून शरीरसंबंध जोडणे सुरू केले. वर्षभरात त्यांनी अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान, त्यांच्या संबंधाचा बोभाटा झाल्यामुळे दोन्हीकडे माहिती गेली. लग्नासाठी तरुणी आक्रमक झाल्याचे पाहून मध्यंतरी कुणालचे वडील किशोर सावरकर आणि आई मीना किशोर सावरकर यांनी तुमचे लग्न लावून देतो, असे सांगितले. कुणालच्या आईवडिलांकडून आश्वासन मिळाल्याने ती आश्वस्त झाली. मात्र, अलीकडे लग्नाचा विषय काढताच कुणाल तिला टाळू लागला. तो दुसरीकडे गुंतल्याचा संशय आल्याने ती पुन्हा आक्रमक झाली. यावेळी त्याने लग्नास चक्क नकार दिला. त्याच्या आईवडिलांनीही कानावर हात ठेवले. त्यामुळे तरुणीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नेरकर यांनी सोमवारी कुणाल तसेच त्याच्या आईवडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.प्रकरणाला दुसरी बाजू ?या प्रकरणाला दुसरी बाजू असल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकरण तांत्रिक स्वरूपाचे (प्रेमप्रकरण आणि शरीरसंबंध) असल्याने आरोपींना अटक करण्याची गडबड करण्याऐवजी सर्व बाजूने प्रकरणाचा तपास केला जात असल्याचे जरीपटका पोलीस सांगत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार