शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

नागपुरात वहिनीसह पुतणीचा खून करून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:45 IST

कामवासनेत आकंठ बुडालेल्या एका तरुणाने आपली वहिनी (वय २८) व चार वर्षीय चिमुकल्या पुतणीचा खून करून त्यांच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना वाडी पोलीस ठाणे हद्दीतील वडधामनानजीकच्या सुराबर्डी (तकीया) येथे घडली. चंद्रशेखर भिंद (२६) असे नराधमाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. खुनाची ही घटना बुधवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देवाडीतील खळबळजनक घटना : आरोपी तरुणास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर/ वाडी : कामवासनेत आकंठ बुडालेल्या एका तरुणाने आपली वहिनी (वय २८) व चार वर्षीय चिमुकल्या पुतणीचा खून करून त्यांच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना वाडी पोलीस ठाणे हद्दीतील वडधामनानजीकच्या सुराबर्डी (तकीया) येथे घडली. चंद्रशेखर भिंद (२६) असे नराधमाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. खुनाची ही घटना बुधवारी दुपारी घडली.मृताचा पती हा ट्रक चालक आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील भदोई, येथील रहिवासी असून, काही वर्षांपासून रोजगारानिमित्त नागपुरात आला. त्याने २००९ मध्ये प्रेमविवाह केला. ती मुस्लीमधर्मीय असून, तीसुद्धा उत्तर प्रदेशातील रहिवासी होती. २६ नोव्हेंबर रोजी तो ट्रक घेऊन जालन्याला रवाना झाला. पत्नी व मुलगी दोघे एकटेच घरी होते. चंद्रशेखर हा इंदोऱ्याला राहतो. त्याने डीफार्म केले आहे. शिक्षण पूर्ण करून तो एका औषधीच्या दुकानात कामाला आहे. तो आपल्या एका मित्रासोबत भाड्याच्या खोेलीत राहतो. त्याला मोबाईलवर ‘ब्ल्यू फिल्म’ पाहण्याचे व्यसन आहे. त्यामुळे शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा त्याच्या मनात सातत्याने असे. तो आपल्या मोठ्या भावाच्या घरीही येत-जात असे. यादरम्यान त्याची आपल्या वहिनीवर नजर गेली. भावाने आंतरधर्मीय विवाह केल्यानेही तो दुखावला होता. भाऊ बाहेर गेल्याची त्याला माहिती होती. त्यामुळे आपली कामवासना शमविण्यासाठी तो बुधवारी दुपारी आला व वहिनीसोबत बोलू लागला. त्याने वहिनीला मोबाईल मागितला. मोबाईल देताच त्याने बळजबरी सुरू केली. तिने विरोध करताच संतापून त्याने तिचा गळा आवळून खून केला. खून केल्यावर नराधमाने वहिनीच्या मृतदेहावरच बलात्कार केला. चंद्रशेखरला संशय होता की त्याची चार वर्षाची पुतणी त्याला ओळखते. ती आपला भेद उघडकीस आणू शकते. म्हणून त्या नराधमाने चार वर्षाच्या चिमुकली पुतणीचाही खून केला आणि तिच्या मृतदेहावरही पाशवी अत्याचार केला. हे दुष्कर्म केल्यानंतर तो तेथून फरार झाला.रात्री ८ वाजता शेजाऱ्यांची त्यांच्या घरावर नजर गेली. लाईट बंद होता. दरवाजा उघडला होता. मायलेकीची कुठलीही हालचाल किंवा आवाजही येत नसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले तेव्हा आईचा मृतदेह पलंगावर तर चिमुकलीचा मृतदेह जमिनीवर पडून होता. शेजाऱ्यांनी लगेच वाडी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी पतीला सूचना दिली. त्यावेळी तो जालन्यातील सिंदखेडजवळ होता. गुरुवारी सकाळीच तो नागपुरात पोहोचला.पोलिसांना सुरुवातीला पतीवरच संशय आला. परंतु तो जालन्याजवळ असल्याचे समजले तेव्हा पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलली. वस्तीतील संशयितांची विचारपूस केली. परंतु कुठलीही माहिती मिळाली नाही. खून जवळच्याच व्यक्तीने केला असावा, असा पोलिसांना संशय होताच. त्यांची चंद्रशेखरवर नजर गेली. पोलीस दुपारपासूनच चंद्रशेखरला विचारपूस करीत होते. सुरुवातीला त्याने नकार दिला, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खून आणि बलात्कार केल्याची कबुली दिली. त्याच्या गोष्टी ऐकून पोलिसही हादरून गेले.सोशल मीडियाचे व्यसनचंद्रशेखरला यू-ट्यूबवर ‘ब्ल्यू फिल्म’ पाहण्याचे व्यसन होते. तो दिवसभर ‘ब्ल्यू फिल्म’ पाहत असे. त्यामुळे त्याच्या मनात नेहमीच कामवासना राहायची. नराधम चंद्रशेखरने सांगितल्यानुसार, वहिनीचा खून केल्यानंतरही त्याला केवळ शारीरिक भूक कशी मिटवू हेच सूचत होते. ही घटना म्हणजे सोशल मीडियाच्या दुष्परिणामाचे ज्वलंत उदाहरण आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून