शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नातेवाईकाने केला चिमुकलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:09 IST

शेजारी राहणाऱ्या चिमुकलीवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार केला. ७ जूनला दुपारी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.

ठळक मुद्देआरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेजारी राहणाऱ्या चिमुकलीवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार केला. ७ जूनला दुपारी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. शनिवारी रात्री या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. अजय दिलीप भारती (वय २३) असे त्याचे नाव आहे.आरोपी अजय भारती नंदनवनमध्ये राहतो. तो खासगी वाहनचालक आहे. शेजारी त्याचे नातेवाईक राहतात. नातेवाईकांची ८ वर्षीय मुलगी ७ जूनला दुपारी ४ वाजता घरासमोर खेळत होती. त्यावेळी कार घेऊन आरोपी तेथे आला. मुलीच्या आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून आरोपीने तिला डॉल घेऊन देतो, असे आमिष दाखवून सोबत नेले. कारमध्ये बसवल्यानंतर वाहनातच त्याने तिच्यावर बलात्कार केला. अनैसर्गिक कृत्यही केले. कुणाला काही सांगितल्यास तुझ्या आईवडिलांना तलवारीने ठार मारेन, अशी धमकी देऊन आरोपीने तिला घरी नेऊन सोडले. भीतीमुळे मुलगी गप्प राहिली. रात्री मुलीची प्रकृती बिघडली. तेव्हा आईने तिला विचारणा केली असता हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. दोन दिवस बदनामीच्या धाकाने गप्प बसलेल्या मुलीच्या आईने शेवटी ९ जूनला या प्रकरणाची तक्रार नंदनवन ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचे कलम ३६३, बलात्कार (३७६), अनैसर्गिक कृत्य (३७७) आणि धमकी देणे (५०६) च्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. पीडित अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसारही कारवाई केली. त्याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. पुढील चौकशी उपनिरीक्षक बांबोळे करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कार