शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गुंगीचे औषध देऊन बलात्कार : व्हिडीओ क्लीप बनविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:03 IST

बर्थ डे पार्टीत गुंगीचे औषध प्यायला देऊन एका आरोपीने तरुणीला (वय २७) रिसोर्टवर नेऊन बलात्कार केला. मोबाईलमध्ये त्याचे चित्रण करून त्या आधारे तिला ब्लॅकमेल केले. त्यानंतर वारंवार तो तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला. परिणामी तरुणी गर्भवती झाली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने आता तिला वाऱ्यावर सोडले. परिणामी तरुणीने सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

ठळक मुद्देगर्भवती झाल्यानंतर लग्नाला नकार : सदरमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बर्थ डे पार्टीत गुंगीचे औषध प्यायला देऊन एका आरोपीने तरुणीला (वय २७) रिसोर्टवर नेऊन बलात्कार केला. मोबाईलमध्ये त्याचे चित्रण करून त्या आधारे तिला ब्लॅकमेल केले. त्यानंतर वारंवार तो तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला. परिणामी तरुणी गर्भवती झाली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने आता तिला वाऱ्यावर सोडले. परिणामी तरुणीने सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.समीर अस्मत खान (रा. उद्योग बिल्डींग आशियाना, मोतीबाग)असे आरोपीचे नाव आहे. तो इव्हेंट मॅनेजर असून, तरुणी त्याच्याच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करायची. तरुणीच्या तक्रारीनुसार, २६ ऑक्टोबर २०१७ मध्ये समीरने सदरमधील एका रेस्टॉरंटमध्ये बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत तरुणीलाही त्याने बोलवले होते. खाण्यापिण्याच्या बहाण्याने त्याने तिला गुंगीचे औषध दिले. तिची शुद्ध हरविल्यानंतर त्याने कारमधून तिला नागपूर बाहेर सावनेर मार्गावरच्या एका रिसॉर्टमध्ये नेले. तेथे तिच्यावर बलात्कार करून आरोपीने त्याची व्हिडीओ क्लीप बनविली. तरुणी शुद्धीवार आल्यानंतर त्याने ती क्लीप दाखवून या प्रकाराची वाच्यता केल्यास क्लीप व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीच्या धाकामुळे तरुणी गप्प बसल्याचे पाहून आरोपीने नंतर तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले. तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर तो बलात्कार करू लागला. ती गर्भवती झाल्याने आरोपी समीर खानने तिला लग्नाचे आमिष दाखवले. गर्भवती असताना देखिल तरुणीसोबत त्याचे शरीरसंबंध प्रस्थापित करणे सुरूच होते. १८ जानेवारीला रात्री याच उद्देशाने तो तिच्याकडे आला. यावेळी लग्नाचा विषय काढताच त्याने लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्यावरून या दोघांत कडाक्याचे भांडण झाले. तो लग्न करायला तयार नसल्याने तिने सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी समीर खानविरुद्ध बलात्कार करून धमकी देण्याच्या आरोपासोबतच अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.कारमध्येच शरिरसंबंध !लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे तरुणी त्याच्यासोबत ईकडे तिकडे फिरत होती. तो तिला त्याच्या कारने वेगवेगळ्या भागात न्यायचा आणि कारमध्येच तिच्यावर बलात्कार करायचा. तरुणीने तिच्या तक्रारीतही हा प्रकार नमूद केला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार