लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाचे आमिष दाखवून एक बिल्डरने फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थिनीचे साडेतीन वर्षे शारीरिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नास नकार दिल्यानंतर विद्यार्थिनीने कोतवाली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.रमण सावरकर (३५) रा. खामला असे आरोपीचे नाव आहे. पीडित २५ वर्षीय तरुणी ही २०१५ मध्ये शहरातील एका फॅशन डिझायनिंग संस्थेत शिकत होती. या संस्थेत रमणचेही येणे जाणे होते. या दरम्यान फेब्रुवारी महिन्यात तिची रमणसोबत मैत्री झाली. पीडितेच्या तक्रारीनुसार रमणने तिला लग्नाचे आमिष दिले. ती कोतवाली पोलीस ठाणे परिसरात राहते. २३ फेब्रुवारी २०१५ रोजी रमण तिच्या घरी आला. तिथे त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून तो तिच्याशी नेहमीच शारीरिक संबंध बनवू लागला. ३० आॅगस्ट २०१८ पर्यंत दोघांमध्ये संबंध कायम होते. परंतु मागील काही दिवसांपासून ती त्याला लग्न करण्याबाबत म्हणू लागली. तेव्हा त्याने तिच्याशी फारकत घेतली. लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने विद्यार्थिनीला कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली. तिने रमणला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याच्या व्यवहरात कुठलाही बदल न झाल्याने अखेर तिने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार व धमकावण्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे माहीत होताच रमण फरार झाला.
नागपुरात फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:19 IST
लग्नाचे आमिष दाखवून एक बिल्डरने फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थिनीचे साडेतीन वर्षे शारीरिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नास नकार दिल्यानंतर विद्यार्थिनीने कोतवाली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरात फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार
ठळक मुद्देसाडेतीन वर्षांपासून करीत होता शोषण : बिल्डरवर गुन्हा दाखल