लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर वारंवार बलात्कार केला. ही घटना यशोधरानगरमध्ये घडली.सुमित दयाराम महादुशिंदे (२५) असे आरोपीचे नाव असून, तो शिवशक्तीनगर येथील रहिवासी आहे. पीडित युवती २९ वर्षाची असून, ती भोपाळ येथे राहते. ती व्यवसायाने एमआर आहे. पोलीस तक्रारीनुसार, दोन वर्षापूर्वी दोघांची फेसबुकवर मैत्री झाली. दरम्यान, आरोपीने तिला लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून युवती २७ नोव्हेंबर २०१७ रोजी आरोपीच्या घरी आली. त्यावेळी आरोपीने तिच्यासोबत शारीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर युवती फेब्रुवारी-२०१८ मध्ये पुन्हा आरोपीच्या घरी आली. आरोपीने पुन्हा तिच्यासोबत शरीरसंबंध जोडले. त्यानंतर आरोपीने युवतीला टाळणे सुरू केले. परिणामी, युवतीने दोन महिन्यापूर्वी दुसऱ्या युवकासोबत लग्न केले. तिने पतीला आरोपीच्या कृत्याची माहिती दिली व पतीच्या मदतीने भोपाळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून भोपाळ पोलिसांनी एफआयआर दाखल केला व हे प्रकरण यशोधरानगर पोलिसांकडे हस्तांतरित केले. यशोधरानगरचे सहायक पोलीस निरीक्षक लबडे प्रकरणाचा तपास करीत आहेत.
नागपुरात फेसबुक मैत्रिणीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:43 IST
फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर वारंवार बलात्कार केला. ही घटना यशोधरानगरमध्ये घडली.
नागपुरात फेसबुक मैत्रिणीवर बलात्कार
ठळक मुद्देवर्षभरानंतर तक्रार : यशोधरानगरमधील घटना