शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या शिवसंकल्प यात्रेतून रामटेक, यवतमाळ वगळले, कारण काय? तर्कवितर्कांना उधाण

By कमलेश वानखेडे | Updated: January 6, 2024 19:24 IST

Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शनिवारी सुरू झालेल्या शिवसंकल्प यात्रेतून नागपूर व यवतमाळ-वाशिम हे दोन लोकसभा मतदारसंघ वगळण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी जाहीर झालेल्या कार्यक्रमात या दोन्ही मतदारसंघांचा समावेश होता.

-  कमलेश वानखेडेनागपूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शनिवारी सुरू झालेल्या शिवसंकल्प यात्रेतून नागपूर व यवतमाळ-वाशिम हे दोन लोकसभा मतदारसंघ वगळण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी जाहीर झालेल्या कार्यक्रमात या दोन्ही मतदारसंघांचा समावेश होता. आता प्रत्यक्ष यात्रा निघाली असताना दोन्ही मतदारसंघाचा त्यात समावेश केला नसल्याने या मतदारसंघातील कार्यकर्त्यांध्ये अस्वस्थ झाले आहेत. विदर्भातील या महत्वाच्या दोन जागा शिंदे गटाकडून भाजपसाठी सोडल्या जातील का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेली शिवसंकल्प यात्रा ही लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठीच असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे १३ खासदार आले होते. त्यामुळे ही यात्रा आपल्या मतदारसंघात व्हावी, असे शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रत्येक खासदारांची इच्छा होती. मात्र आता १३ पैकी ११ मतदारसंघातच शिवसंकल्प यात्रा जात आहे. शनिवारी (६ जानेवारी) शिरुर व मावळ या दोन मतदारसंघातून ही यात्रा सुरू झाली. ८ जानेवारी रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग, १० जानेवारी रोजी हिंगोली व धाराशीव, ११ जानेवारी रोजी परभणी व छत्रपती संभाजीनगर, १३ जानेवारी रोजी अमरावती व बुलडाणा, २४ जानेवारी रोजी रायगड, तसेच २७ व २८ जानेवारी रोजी महाअधिवेशन घेऊन समारोप होणार आहे.

शिवसंकल्प यात्रेच्या पहिल्या वेळापत्रकात २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता यवतमाळ- वाशिम व त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता रामटेक मतदारसंघाचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आता नव्याने जारी झालेल्या कार्यक्रमात या दोन्ही मतदारसंघांचा समावेश नाही. यावर दोन्ही मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्षभाजपने रामटेक व यवतमाळ-वाशिम या दोन मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपचे मोठे नेतेही या दोन जागांसाठी आग्रही आहेत. यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा ईडीने नोटीस बजावली आहे. दोन-तीन जागांची अदलाबदली करण्याचा भाजपचा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व घडामोडी पाहता या दोन मतदारसंघांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेVidarbhaविदर्भ