शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक पॅसेंजर अजनी रेल्वे स्थानकापर्यंत चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 22:04 IST

प्रवाशांच्या सुविधेसाठी रामटेक पॅसेंजरला कामठीवरून नागपूर किंवा अजनी रेल्वे स्थानकापर्यंत चालवावी, अशी सूचना विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी केली.

ठळक मुद्दे‘डीआरयूसीसी’ सदस्यांची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी रामटेक पॅसेंजरला कामठीवरून नागपूर किंवा अजनी रेल्वे स्थानकापर्यंत चालवावी, अशी सूचना विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी केली.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक बुधवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या सभागृहात विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीला विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य मुरारीलाल शर्मा, आनंद कुमार कारिया, नटवरलाल गांधी, विकास बोथरा, नानकराम अनवानी, मुरलीधर ढोबरे, नरेंद्र मुदलियार, चंद्रकांत पांडे, कुंजबिहारी अग्रवाल, अरुण आखतकर, योगेश अग्रवाल आणि संजय गजपुरे उपस्थित होते. बैठकीत सदस्यांनी रेल्वे प्रशासनास प्रवाशांच्या सुविधेसाठी उपयुक्त सूचना केल्या. यात कामठी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर कोच इंडिकेटर लावावे, प्लॅटफार्म शेडचा विस्तार करणे, गोंदिया रेल्वेस्थानक परिसरात त्वरित कमर्शियल कॉम्प्लेक्स सुरू करावे, गोंदिया-नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या सामान्य आणि मासिक पासधारकांना सुविधा द्याव्या, गोंदिया रेल्वे स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेस प्लॅटफार्म क्रमांक १ वरून सोडण्यात यावी, १९३१७/१९३१८ इंदूर-पुरी-इंदूर हमसफर एक्स्प्रेसला गोंदियात थांबा द्यावा, गोंदियात रेल्वेची सेंट्रल स्कूल सुरू करावी, सालेकसा रेल्वे स्थानकावर १२८५५/१२८५६ इंटरसिटी एक्स्प्रेसला थांबा द्यावा, नागभीड रेल्वे स्थानकावर १७००७/१७००८ दरभंगा एक्स्प्रेसला थांबा द्यावा, नागभीड रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला फूट ओव्हरब्रीज तयार करावा, रेल्वेगाड्या आणि स्थानकावर अवैध व्हेंडर आणि इतवारी रेल्वेस्थानक परिसरात अवैध वाहनांवर कारवाई करावी, मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये एलएचबी कोच लावावे, आदी सूचना सदस्यांनी केल्या. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, समिती आपल्या कार्यकाळात रेल्वेसेवेत सुधारणा आणि रेल्वेगाड्यात चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रभावी पद्धतीने कार्य करणार आहे. त्यांनी विभागातील विकासकामे आणि प्रवासी सुविधांची माहिती दिली. यावेळी समितीचे उपाध्यक्ष अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक वाय. एच. राठोड, समितीचे सचिव वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव उपस्थित होते. आभार आशुतोष श्रीवास्तव यांनी मानले.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीnagpurनागपूर