शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ramtek Election Results : रामटेकच्या गडावर भाजपचे पानिपत, जयस्वाल यांची बंडखोरी युतीला भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 23:21 IST

Ramtek Election Results 2019 : Mallikarjun Reddi Vs Ashish Jaiswal Vs Udaysingh Yadav, Maharashtra Assembly Election 2019

ठळक मुद्देकाँग्रेस, बसपालाही लागली धाप

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (रामटेक) : अवघ्या विदर्भाचे लक्ष लागलेल्या रामटेक मतदार संघात शिवसेनेचे बंडखोर अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी भाजपचे पानिपत केले. रामटेकचा गड सर करताना काँग्रेस आणि बसपाला धाप लागली. पोलपंडितांचे अंदाज चुकवीत अपक्ष उमेदवार अ‍ॅड. आशिष जयस्वाल २४ हजार ४१३ मतांनी विजयी झाले. जयस्वाल यांना ६७,४१९ तर भाजपचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांना ४३ हजार ०६ मते मिळाली. येथे काँग्रेसचे उदयसिंग यादव तिसऱ्या क्रमांकावर घसरले. यादव यांना ३२ हजार ४९७ मतावर समाधान मानावे लागले.बसपाचे संजय सत्येकार यांनी ९,४६४ मते आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे रमेश कारामोरे यांनी २४,७३५ मते घेत काँग्रेस आणि भाजपच्या मतांना खिंडार पाडले. यामुळे रामटेकचा गड सर करताना पहिल्या फेरीपासून जयस्वाल यांना अडचण गेली नाही.२०१४ च्या निवडणुकीत आशिष जयस्वाल यांना भाजपचे रेड्डी यांच्याकडून मात खावी लागली होती. त्यावेळी जयस्वाल यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. यावेळी योग्य नियोजन, कार्यकर्त्यांची उत्तम फळी आणि मतदारांमध्ये असलेल्या विश्वासाच्या बळावर त्यांनी विजयश्री खेचून आणली.भाजपचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी यावेळी विकासाच्या नावावर मते मागितली असली तरी मतदारांनी त्यांना नाकारले. प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात काँग्र्रेस मुसंडी मारेल, असे मतदार संघात चित्र होते. प्रहार जनशक्ती पार्टीचे रमेश कारामोरे यांनी चांगली हवा तयार केली होती. त्यामुळे या मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत झाली. युतीत रामटेकची जागा शिवसेनेच्या वाट्यात यावी, यासाठी जयस्वाल अखेरपर्यंत आग्रही होते. शेवटी युतीत ही जागा भाजपाच्या कोट्यात गेली. यानंतर जयस्वाल यांनी बंडखोरी करीत गडावर बंडाचा झेंडा रोवला. जयस्वाल यांना पाडण्याचे आदेश मातोश्रीवरून शिवसैनिकांना धडकले. मात्र सच्चा शिवसैनिक अखेरपर्यंत जयस्वाल यांच्यासाठी रामटेकची खिंड लढवीत राहिला आणि विजय निश्चित केला.शिवसेनेने उमेदवारी नाकारली असली तरी जनतेने उमेदवारी दिल्याने निवडणूक रिंगणात उतरलो. सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी माझ्या विजयासाठी मदत केली. या मतदारसंघातील तरुणांना रोजगार देणे, पांदण रस्त्यांची दुरुस्ती करणे ही कामे अग्रक्रमाने करणार आहे. शिवाय, आपण भाजप- शिवसेना युतीसोबतच राहणार आहे. आशिष जयस्वाल, विजयी उमेदवार, रामटेक

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ramtek-acरामटेकAshish Jaiswalआशीष जयस्वाल