शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

रॅमसन्स समूह हवाला व्यवसायात लिप्त?

By admin | Updated: November 19, 2015 03:21 IST

स्टील व्यवसायात नामांकित रॅमसन्स समूह हवाला व्यवसायात लिप्त असल्याची बाब आयकर धाडीत पुढे आली आहे.

निवास व कार्यालयाची तपासणी सुरू : कोट्यवधींच्या संपत्तीची संशयास्पद कागदपत्रे ताब्यातनागपूर : स्टील व्यवसायात नामांकित रॅमसन्स समूह हवाला व्यवसायात लिप्त असल्याची बाब आयकर धाडीत पुढे आली आहे. धाडीदरम्यान सापडलेली बेहिशेबी संपत्तीची संशयास्पद कागदपत्रे आणि डायरीवरून समूह देशविदेशात हवाला व्यवहारात कार्यरत असल्याच्या दिशेने अधिकारी तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या अधिकारी दोन ठिकाणी तपासणी करीत आहेत. आयकर खात्याने रॅमसन्स ग्रुप आॅफ कंपनी आणि त्याच्या सहयोगी कंपन्या, फर्म व संचालकांची कार्यालये आणि निवासस्थानावर मंगळवारी सकाळी एकाचवेळी १२ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. सध्या नीती-गौरव अपार्टमेंट, रामदासपेठ येथील कंपनीचे कार्यालय आणि रामस्वरुप सारडा व राजेश रामस्वरुप सारडा यांच्या १४, डागा ले-आऊट, उत्तर अंबाझरी मार्गावरील निवासस्थानाची तपासणी सुरू आहे. जप्त केलेल्या हजारो कागदपत्रांमध्ये १०० पेक्षा जास्त कागदपत्रे जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराशी संबंधित आहेत. नागपूर, यवतमाळ आणि पुणे येथे निवासी योजना बनविण्याची समूहाची योजना आहे. रोखीत केलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार, बँक खात्यातील रकमेची तपासणी, लॉकर्समधील रोख व ज्वेलरीचे मूल्यांकन तसेच संचालक, वरिष्ठ अधिकारी, कुटुंबीयांतील सदस्यांचे बयाण घेणे सुरू आहे. एकूण ८० अधिकाऱ्यांपैकी सध्या १५ अधिकारी तपासणी करीत आहेत. १० ठिकाणांवरून ६५ अधिकाऱ्यांना हटविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.रॅमसन्स समूह रामस्वरुप सारडा, लक्ष्मीनारायण सारडा, राजेश रामस्वरुप सारडा आणि सुरेंदरसिंग चहल यांचा आहे. समूहातर्फे रि-रोलिंग, टीएमटी स्टील बार, एमएस अ‍ॅन्गल, फ्लेक्स, अराऊंड, रॉड आदींचे उत्पादन करण्यात येते. या समूहाच्या एकूण पाच कंपन्या असून त्यापैकी राजाराम स्टील प्रा.लि. रॅमसन्स इस्पात प्रा.लि., रॅमसन्स रिफॅक्टरी प्रा.लि. या तीन कंपन्या एमआयडीसी, हिंगणा येथे तर रॅमसन्स टीएमटी प्रा.लि. आणि रॅमसन्स कास्टिंग प्रा.लि. या दोन कंपन्या बाजारगांव, अमरावती रोड येथे कार्यरत आहेत. बोगस कंपन्या आणि हवाला मार्गाने काळा पैसा देशात आणणाऱ्या लोकांवर आयकर विभागाची करडी नजर आहे. करचोरी, खोटी आयकर विवरण भरणारे, खोटी कागदपत्रे व बयाण देणाऱ्यांना आयकर कायद्यात सात वर्ष शिक्षेची तरतूद आहे. (प्रतिनिधी)