शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम ध्वज व अन्य साहित्यांची धडाक्यात विक्री; होणार २०० कोटींचा व्यवसाय

By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 11, 2024 20:16 IST

- झेंडे, दुपट्टे, तोरण लायटिंग, बिल्ले, बॅच, टी-शर्ट, टोपी व अन्य साहित्यांना प्रचंड मागणी : नागपुरातून संपूर्ण महाराष्ट्र व अन्य राज्यात विक्री

नागपूर : अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या शुभप्रसंगी संपूर्ण देशात वातावरण राममय झाले आहे. नागपुरात श्रीरामाची प्रतिमा असलेले झेंडे, दुपट्टे, तोरण, लायटिंग, बिल्ले, टोपी, टी-शर्ट आदींसह अन्य साहित्यांची धडाक्यात विक्री होत आहे. इतवारी येथील १०० हून अधिक दुकानदार विक्री करीत आहे. नागपुरात हा व्यवसाय २०० कोटींहून अधिक होणार असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

प्रचंड मागणीमुळे होऊ लागला साहित्यांचा तुटवडा

धार्मिक साहित्यांचे वितरक व विक्रेते लिलारिया अ‍ॅण्ड सन्सचे गिरीश लिलारिया म्हणाले, गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘घर घर तिरंगा’ अशा आवाहनानंतर संपूर्ण देशात तिरंगा झेंड्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. यंदा श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने श्रीरामाच्या छायाचित्रांर्च्या साहित्यांची दुपटीने विक्री होत आहे. मागणीमुळे किरकोळ दुकानदारांनी ऑर्डर बुक केले आहेत. भिवंडी येथून कपडा येतो तर अहमदाबादला प्रिंंटिंग होते. कटिंग आणि सिलाई नागपुरात होत आहे. त्यानंतर हे धार्मिक साहित्य संपूर्ण महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमध्ये पाठविण्यात येत आहे. दरदिवशी ऑर्डर वाढत असून पुरवठा करणे अशक्य झाले आहे. 

श्रीराम ध्वज आणि दुपट्ट्याला सर्वाधिक मागणीघरोघरी श्रीरामाचे ध्वज लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार बहुतांश नागरिक घरावर श्रीराम ध्वज लावत आहेत. शिवाय तोरण आणि पताकाची विक्रीला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय २२ जानेवारीला श्रीरामाचे चित्र असलेले गळ्यातील दुपट्टे आणि वाहनांवर लावण्यासाठी झेंड्याची खरेदी करीत आहे. अनेकांनी श्रीरामाची प्रतिमा असलेले टी-शर्ट खरेदी केले आहेत. प्राणप्रतिष्ठेचा मकरसंक्रातीच्या व्यवसायावर परिणामनागपुरातून संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना या राज्यांमध्ये साहित्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. मागणी वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. निर्मितीही वेगात सुरू असल्याचे इतवारीतील वितरक आणि विक्रेत्यांनी सांगितले. धार्मिक साहित्यांच्या विक्रीचा मकरसंक्रातीच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. यंदा मकरसंक्रातीच्या व्यवसायात ३० ते ४० टक्के घसरण झाल्याचे दिसून येत आहे. भेटस्वरुपात देण्यात येणाऱ्या भांड्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.  

साहित्य विक्री दर (रुपये) : राम, हनुमान दुपट्टे ९ ते १५०तोरण पताका २५ रु. पॅकेटलायटिंग ४५ ते १५० रू. पॅकेटबॅच व बिल्ले ५ ते २० नगटोपी ५ ते २० नगटी-शर्ट ८० ते १५० नगवाहनाचे झेंडे १५ नग

गेल्यावर्षी तिरंगा झेंडा तर यंदा श्रीराम ध्वज व संबंधित साहित्यांची सर्वाधिक विक्री होत आहे. मागणीमुळे बाजारपेठेत तुटवडा जाणवत आहे. कपडा आणि प्रिंट बाहेरून झाल्यानंतर नागपुरात कटिंग आणि सिलाई होत आहे. येथून नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना राज्यात पुरवठा होत आहे. नागपुरात १०० हून अधिक विक्रेते विक्री करीत आहेत.गिरीश लिलारिया, साहित्यांचे वितरक व विक्रेते.

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) संपूर्ण देशात श्रीरामाचे ध्वज आणि अन्य साहित्यांचे नि:शुल्क वाटप करीत आहे. या निमित्ताने देशात ५० हजार कोटींचा व्यवसाय होणार आहे. नागपुरात १ लाखाचे साहित्य रॅलीद्वारे जनजागृती करून वाटप करीत आहे. व्यापाऱ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. २२ जानेवारी हा दिवस दरवर्षी श्रीरामाचा जन्मदिन म्हणून साजरा होणार आहे. बी.सी. भरतीया, राष्ट्रीय अध्यक्ष, ‘कॅट’

टॅग्स :nagpurनागपूरRam Mandirराम मंदिर