शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

रामनवमीचा उपराजधानीत चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:38 IST

रामनवमीचे औचित्य साधून पोलिसांचा शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या संवेदनशील वस्त्या आणि विशिष्ट झोपडपट्ट्यानुसार पोलिसांचे संख्याबळ बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशहरातील पोलीस ठाणेनिहाय संख्याबळ : एसआरपी, क्यूआरटीसह मोठ्या संख्येत सशस्त्र पोलीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामनवमीचे औचित्य साधून पोलिसांचा शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या संवेदनशील वस्त्या आणि विशिष्ट झोपडपट्ट्यानुसार पोलिसांचे संख्याबळ बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.रामनवमीचा उत्सव उपराजधानीचे आगळे वैशिष्ट्य आहे. सर्वधर्मसमभावाचे आदर्श उदाहरण ठरणारी, पोद्दारेश्वर राममंदिरातून निघणारी वैभवी शोभायात्रा तर लाखो भाविकांच्या श्रद्धा आणि आकर्षणाचा विषय असते. शोभायात्रेत सहभागी होणारी मंडळी आणि आकर्षक देखावे डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. शोभायात्रेच्या स्वागतासाठी शहरभर कमानी उभारल्या जातात. नेत्रदीपक सजावट, लाईटिंग केले जाते. रस्त्यारस्त्यावर या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी सर्वधर्मांची मंडळी पुढे येत असतात. शोभायात्रेत सहभागी झालेल्यांना अनेकांकडून अल्पोपहार, चहा, ज्यूस, सरबत वितरित केले जाते. शोभायात्रेत तोबा गर्दी असते. त्यामुळे समाजकंटकांनी काही अनुचित प्रकार करू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. शोभायात्रेच्या मार्गावर सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ८०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय परिमंडळ निहाय पोलिसांचा बंदोबस्त वेगळा राहणार आहे.अधिकाºयांच्या माहितीनुसार परिमंडळ १ मध्ये ३२ पोलीस अधिकारी, १८३ पुरुष आणि ३८ महिला कर्मचारी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळतील. परिमंडळ २ अंतर्गत ३६ अधिकारी, १८३ पुरुष आणि ४० महिला कर्मचारी तैनात राहतील. परिमंडळ ३ मध्ये पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात २ सहायक आयुक्त, ९ पोलीस निरीक्षक, २७ पीएसआय, एपीआय आणि २२९ पुरुष तसेच २७ महिला कर्मचारी जबाबदारी सांभाळणार आहेत.---आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी सज्जऐनवेळी काही स्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी पोलिसांनी राज्य राखीव दलाचे दोन प्लाटून, क्यूआरटीची चार पथके, आरसीबी सज्ज राहणार आहेत. मोठ्या संख्येत सशस्त्र पोलीसही ताफाही राहणार आहे. रामनवमीचा उत्सव याहीवर्षी उत्साहात आणि शांततेत पार पडेल, कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरPoliceपोलिस