शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी संघटनांमध्ये चढाओढ

By admin | Updated: April 10, 2016 03:17 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असून प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्षच करण्यात येते.

कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर आक्रमक पवित्रा : कुलगुरुंसमवेत चर्चा, धरणे आंदोलननागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असून प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्षच करण्यात येते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरुन विद्यापीठातील दोन कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांच्यामध्येच चढाओढ निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. नागपूर विद्यापीठ बहुजन कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेऊन चर्चा केली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कर्मचारी संघाने विद्यापीठात धरणे आंदोलन करून प्रशासनाला इशारा दिला.नागपूर विद्यापीठ बहुजन कर्मचारी संघटनेकडून वारंवार प्रशासनाला पत्र पाठविण्यात येत होते. अखेर ६ एप्रिल रोजी कुलगुरुंनी त्यांना चर्चेसाठी वेळ दिला. यावेळी नागपूर विद्यापीठातील रखडलेली पदभरती, विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर कऱणे, कर्मचाऱ्यांच्या ‘ग्रेड-पे’ तसेच पदनामातील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणे, महिलांसाठी कॉमन रुम, धान्य अग्रीममध्ये वाढ करणे इत्यादी बाबींवर चर्चा झाली. कुलगुरूंनी बहुतांश मागण्यांना सकारात्मक उत्तर दिले असल्याची माहिती अध्यक्ष सी.डी.शेळके यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष नरेश कांबळे, मुख्य सचिव राजेश खानोरकर, सचिव प्रदीप मसराम, कोषाध्यक्ष प्रशांत वैद्य उपस्थित होते.(प्रतिनिधी)