शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाच्या पूर्व संध्येला ईव्हीएम विरोधात रॅली

By कमलेश वानखेडे | Updated: December 11, 2024 16:35 IST

Nagpur : महाविकास आघाडीतील नेते सहभागी होणार

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्व संध्येला १५ डिसेंबर रोजी नागपुरात ईव्हीएम विरोधात रॅली काढली जाणार आहे. दुपारी १२ वाजता महालातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघून मेडिकल चौकातील राजाबक्षा मैदानावर जाहीर सभेत रुपांतर होऊन समारोप होईल.

इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरमतर्फे ही रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीत माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, उद्धव सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, सुनील केदार, नितीन राऊत, आ. विकास ठाकरे, आ. संजय मेश्राम, खा. श्यामकुमार बर्वे, ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाचे नेते ॲड. महमूद प्राचा, इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरमच्या राष्ट्रीय समन्वयक ॲड. स्मिता कांबळे आदी सहभागी होतील. लोकशाही व संविधान वाचविण्याच्या या ईव्हीएम विरोधी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमचे राष्ट्रीय निमंत्रक प्रितम बुलकुंडे, राष्ट्रीय ऑर्गनायझर ॲड. आकाश मून यांनी केले आहे.

महाविकास आघाडीतर्फे राज्यात विविध भागात ईव्हीएम विरोधात आंदोलने, धरणे सुरू आहेत. महायुती सरकार लोकशाही मार्गाने नव्हे तर ईव्हीएमच्या गैरवापरातून सत्तेवर आले आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळेच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ईव्हीएम विरोधीत रॅलीत सहभागी होऊन सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा मानस आहे.

टॅग्स :EVM Machineईव्हीएम मशीनnagpurनागपूर