शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बहिणींनी पाठविलेल्या राख्यांना भावांपर्यंत पोहचण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 21:43 IST

यंदाही अनेक भावांना बहिणीने पाठविलेले रक्षासूत्र रक्षाबंधनाला मिळणार नसल्याचे दिसते आहे. कारण रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये (आरएमएस) असलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे राख्यांच्या पार्सलचे गठ्ठे पडून आहेत.

ठळक मुद्देरेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये पडले आहेत राख्यांचे पार्सल : अपुऱ्या यंत्रणेचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जग कितीही ऑनलाईन झाले, तरी भारतीय सणांचे महत्त्व आजही कायम आहे. बहीण भावाचे नाते जपणारा रक्षाबंधनाचा सण भावाला रक्षासूत्र बांधून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. बहीण देशाच्या कुठल्याही भागात असो, ती रक्षाबंधनाला भावाला रक्षासूत्र पाठवून आपल्या नात्यातील ऋणानुबंध जपते. पण बहिणीने पाठविलेले रक्षासूत्र भावाला वेळेवर मिळत नाही. यंदाही अनेक भावांना बहिणीने पाठविलेले रक्षासूत्र रक्षाबंधनाला मिळणार नसल्याचे दिसते आहे. कारण रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये (आरएमएस) असलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे राख्यांच्या पार्सलचे गठ्ठे पडून आहेत.रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी मिळावी म्हणून बहीण वाटेल तो आटापिटा करून, वेळेत राखी खरेदी करून पोस्टाने पाठविते. आजही डाक विभाग आणि राखी हे ऋणानुबंध अजूनही जुळून आहे. त्यामुळे रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये राखीच्या सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात राख्या देशभरातून येतात. सूत्रांच्या मते, या काळात किमान १५ ते २० हजार राखी दररोज येथे येतात. जिल्हा, तालुका, गाव यानुसार राख्यांचे सॉर्टिंग करण्यात येते. नागपूर रेल्वेस्थानकावरील रेल्वे मेल सर्व्हिसेसच्या कार्यालयातून संपूर्ण विदर्भासह बुलडाणा, जळगावपर्यंत राख्या पाठविल्या जातात. देशभरातून रेल्वेच्या पार्सलने आलेल्या राख्यांचे विभाजन करण्यासाठी रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे, त्याचे विभाजन आणि संबंधित डाक कार्यालयाला वेळेत वितरित होऊ शकत नाही. अपुऱ्याकर्मचाऱ्यांमुळे रेल्वेच्या पार्सल विभागात राख्यांच्या पार्सलचे गठ्ठे पडून आहेत. सूत्रांच्या मते, रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये सॉर्टिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. राखीसारख्या सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात देशभरातून पार्सल येत असल्यामुळे सॉर्टिंगच्या कामासाठी कर्मचारी वाढविण्याची गरज आहे. राख्यांचे गठ्ठे आरएमएसमध्ये पडून असल्याचे दिसले. परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी त्याचे फोटो काढण्यास मनाई केली.अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये पडून असलेल्या गठ्ठ्यावरून असे निदर्शनास येते की, यंदाही भावांना रक्षाबंधनाला रक्षासूत्राची प्रतीक्षा करावी लागणार आहे.कुठलेही पार्सल पेन्डिंग नाहीयासंदर्भात आरएमएसमधील एका कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्यांचे म्हणणे होते की, राख्यांचे सॉर्टिंग नियमित होत आहे. रक्षाबंधनाच्या काळात डाक सॉर्टिंग करण्यासाठी आम्ही अतिरिक्त कर्मचारी लावतो. दररोज आलेल्या पार्सलची सॉर्टिंग होत आहे. संबंधित पोस्टाच्या कार्यालयाकडे ती पाठविली जात आहे. कुठलेही पार्सल आमच्याकडे पेन्डिंग नाही.

टॅग्स :Rakhiराखीnagpurनागपूर