साेन्याच्या दागिन्यांसह राेकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:08 IST2021-04-25T04:08:43+5:302021-04-25T04:08:43+5:30

नरखेड : चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्याचे दागिने, राेख रक्कम व इतर साहित्य असा एकूण १४ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून ...

Rake lamps with Saenya ornaments | साेन्याच्या दागिन्यांसह राेकड लंपास

साेन्याच्या दागिन्यांसह राेकड लंपास

नरखेड : चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्याचे दागिने, राेख रक्कम व इतर साहित्य असा एकूण १४ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना नरखेड शहरात नुकतीच घडली.

राेशन वसंतराव वाळके (२६, रा. नरखेड) हा व त्याचे कुटुंबीय बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने कपाटातील १० हजार रुपयांचे साेन्याचे दागिने, ३,५०० रुपये राेख, आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएमकार्ड, काॅलेजचे प्रवेशपत्र, ॲडमिशन स्लिप, राेशनच्या मावस बहिणीचे एमटीएमकार्ड व ५०० रुपये राेख असा एकूण १४ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. चाेरी झाल्याचे लक्षात येताच राेशनने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार राजू गजभिये करीत आहेत.

Web Title: Rake lamps with Saenya ornaments