नागपूर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त २२ व्या राजीव सद्भावना दौडीचे आयोजन उद्या दि.२० आॅगस्ट रोजी रिझर्व्ह बँक शेजारच्या संविधान चौकातून होणार आहे. राजीव स्पोर्टस् फाऊंडेशनचे सचिव संजय दुधे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.गेल्या २१ वर्षांपासून नागपुरात या दौडीचे आयोजन होत असून यंदा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच धावपटूंचा यात समावेश राहील, असे ते म्हणाले. यानिमित्त राजीव सद्भावना सप्ताह पाळण्यात येणार असून निबंध स्पर्धा, चित्रकला, युवा परिसंवाद, रक्तदान करणाऱ्यांचा सत्कार असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजीव सद्भावना दौडीचे आयोजन कस्तुरचंद पार्कवरून हलविण्याच्या सूचना आयोजकांना वेळेवर मिळाल्या. त्यामुळे तारांबळ झाली, पण दौड ठरल्यानुसार आणि निर्धारित मार्गाने पार पडेल, असे फाऊंडेशनचे उपाध्यक्ष गौरव दलाल यांनी सांगितले. आ. कृपाशंकरसिंग आणि पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत सकाळी ६.३० वाजता दौडीला हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
राजीव गांधी सद्भावना दौडीचे आयोजन उद्या
By admin | Updated: August 19, 2014 00:57 IST