शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

राजधानी एक्स्प्रेसमध्ये गोळी चालविणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:28 AM

बिलासपूरवरून नवी दिल्लीला जात असलेल्या १२४४१ राजधानी एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये गुरुवारी रात्री हवालदाराला गोळी लागल्याच्या घटनेत आमला लोहमार्ग पोलिसांनी एसपीजीचे सिक्युरिटी असिस्टंंटविरुद्ध (मेजर) गुन्हा दाखल केला. आरोपीला शुक्रवारी जामीन मिळाला आहे.

ठळक मुद्देआरोपीला मिळाला जामीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिलासपूरवरून नवी दिल्लीला जात असलेल्या १२४४१ राजधानी एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये गुरुवारी रात्री हवालदाराला गोळी लागल्याच्या घटनेत आमला लोहमार्ग पोलिसांनी एसपीजीचे सिक्युरिटी असिस्टंंटविरुद्ध (मेजर) गुन्हा दाखल केला. आरोपीला शुक्रवारी जामीन मिळाला आहे.आमला लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी एस. एन. मिश्रा यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री बिलासपूर-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक बी-६, बर्थ क्रमांक ६३ वर प्रवास करीत असलेल्या प्रवाशाला गोळी लागल्याची सूचना मिळाली होती. त्यावर प्लॅटफार्म क्रमांक ३ वर रात्री १०.४० वाजता जखमी प्रवाशाला गाडीखाली उतरविण्यात आले. जखमी प्रवाशाच्या पायातून रक्त जात होते. जखमी प्रवाशाने आपले नाव मन्नु थॉमस (२८) रा. केरळ हल्ली मुक्काम जीआरसी सेंट्रल नागपूर असे सांगितले. तो एमआयजी बंगळुरमध्ये हवालदाराच्या पदावर तैनात आहे. तो आॅगस्ट २०१८ पासून बास्केटबॉल टीममध्ये प्रॅक्टीस करण्यासाठी आला होता. आपल्या अधिकाºयांसोबत तो राजधानी एक्स्प्रेसने नागपूरवरून दिल्लीला जात होता. थॉमसने सांगितले की, नागपुरातून गाडी सुटल्यानंतर त्याच्या गावातील राजेश मोहन हा एसपीजीत सिक्युरिटी असिस्टंट (मेजर) आहे. त्याच्याशी बोलण्यासाठी तो १०.१५ वाजता गेला होता. बोलताना राजेशने आपले पिस्तुल लोड केले. यात एक राऊंड फायर होऊन त्याच्या पायावर गोळी लागली. आरोपी राजेश मोहन दारू पिऊन असल्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जखमी मनु थॉमसला वायुसेनेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी मनु थॉमस यांच्या तक्रारीवरून आरोपी राजेशविरुद्ध भादंविच्या कलम ३३७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यास जामिनावर सोडण्यात आले आहे. त्याच्यापासून ९ एमएमची पिस्तुल, १३ जीवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :FiringगोळीबारRajdhani Expressराजधानी एक्स्प्रेस