शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

ओबीसी साहित्य संमेलनातून मांडणार वंचित महिलांच्या व्यथा : विजया मारोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 21:03 IST

कवयित्री आणि साहित्यिक म्हणून विजया मारोतकर सर्वपरिचित आहेत. राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पहिल्या ‘ओबीसी महिला साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देएक कवयित्री म्हणून पहिलीच संमेलनाध्यक्ष हा बहुमान मोलाचालिहित्या महिलांना मनातले विचार बाहेर काढण्याचे करणार आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कवयित्री आणि साहित्यिक म्हणून विजया मारोतकर सर्वपरिचित आहेत. राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पहिल्या ‘ओबीसी महिलासाहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. या संमेलनातून त्या आपल्या साहित्यविषयक संसाराचा वैचारिक पसारा मांडणार आहेत. विशेषत्त्वाने ओबीसी समाजातील वंचित महिलांच्या व्यथांना समाजाच्या पुढे ठेवण्याचा संकल्प विजया मारोतकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.देशात ओबीसी ही वर्गवारी सर्वात मोठी आहे. राजकीय भाषेत बोलायचे तर बहुसंख्यक आणि प्रचलित भाषेत बहुजन म्हणूया. मात्र, विभिन्न जातींमध्ये विभागलेल्या या वर्गात समन्वय नाही. प्रत्येक जातींच्या वेगळ्या संकल्पना, उच्च-निचतेच्या वेगळ्या धारणा आहेत. अशी भिन्नता असली तरी संस्कृती-परंपरा एकच आहे. ओपन आणि एससी/एसटी या दोन्ही टोकाच्या वर्गांना जोडणारा मध्यम दुवा म्हणजे ओबीसी, अशी समर्पक व्याख्या करता येईल. इतर दोन्ही वर्गाप्रमाणे ओबीसींमधील महिला परंपरेने अनेक गोष्टींपासून वंचितच राहील्या आहेत. त्या व्यथा संमेलनाध्यक्ष म्हणून व्यासपीठावर मांडण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. मुळात महिलाच तुमचा धर्म, तुमची संस्कृती, परंपरा नेटाने जपतात. तुमचे घर सांभाळतात, मुला-बाळांना संस्कार देतात आणि स्वत: मात्र कायम उपेक्षित असतात. उपेक्षेचे हे दडपण कधीच बाहेर येत नाही. या दडपणाला वाचा फोडण्यासाठी हे संमेलन आहे आणि त्या व्यासपीठाचा योग्य उपयोग मी करणार असल्याचे मारोतकर म्हणाल्या. चांगल्या विचारांचा पगडा स्वत:च्या मनावर पडू द्या आणि त्यासाठी सतत वाचत राहा, लिहित राहा असे आवाहन करणार असल्याचे विजया मारोतकर म्हणाल्या.हे विषय ठेवणार!ओबीसी महिलांनी मनातले दडपून न ठेवता ते बाहेर काढावे, त्यांचे लिखाण प्रकाशित व्हावे, त्यासाठी सामुदायिक प्रयत्न व्हावे, इतर महिला लेखिकांसोबतच ओबीसी लेखिकांचे वाचन सर्वदूर पोहोचावे, ओबीसी महिला लेखिकांची वेगळी सूची तयार करावी, शासनाने संमेलनाला अनुदान द्यावे, ओबीसी महिला लेखिकांच्या लेखनाला ग्रंथालयात स्थान मिळावे, त्यासाठी स्वतंत्र ग्रंथालये निर्मित व्हावी, प्रकाशन व वितरणाची व्यवस्था व्हावी.. असे ठळक विषय संमेलनातून ठेवणार असल्याचे विजया मारोतकर म्हणाल्या.एका घटनेने जन्म झाला ‘त्या’ कवितेचामाझी एक विद्यार्थीनी होती. फुलपाखराप्रमाणे सतत हसत-बागडत राहणारी. १२वीला असताना अचानक ती शांत असायची. एकदा तिला या परिवर्तनासंदर्भात एकट्यात बोलते केले. प्रेमप्रकरणात मिळालेला दगा आणि त्यातून तिच्या घरात निर्माण झालेला वादंग कळला. घरी जाऊन समजावले. आई समजली मात्र सातच दिवसात त्या पोरीने आत्महत्या केली. ती घटना आजही हेलावून सोडते आणि त्यातून ‘पोरी जरा जपून’ ही कविता जन्माला आली आणि आता ती चळवळ म्हणून उभी झाल्याचे विजया मारोतकर म्हणाल्या. ‘कवितेच्या गावात’, ‘बाई’, ‘चिमणा-चिमणी’ हे त्यांचे काव्यमय सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सतत सुरू आहेत. यासोबतच त्यांनी अनेक काव्यसंग्रह, कथासंग्रह, समीक्षाग्रंथ, लेखसंग्रह, चरित्रलेखन, कादंबरी, इतिहास जतन, चरित्रांतून महिलांच्या व्यथा आणि त्यांना मार्गदर्शन करणारे विचार मांडले आहेत.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीWomenमहिलाliteratureसाहित्य