शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

रेन वॉटर  हार्वेस्टिंग;  जिल्हा परिषदेचे उदासीन धोरण, नागपूरच्या मॉडेलची देशपातळीवरही घेतली होती दखल

By गणेश हुड | Updated: December 27, 2023 15:40 IST

Nagpur News: भूजल पातळी वाढविण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ही काळाजी गरज आहे.  याचा विचार करता  गत काळात नागपूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेलची देशपातळीसोबतच ‘युनिसेफ’सारख्या जागतिक पातळीवरील संस्थेने दखल घेतली होती. मात्र मागील एक-दिड वर्षात  प्रकल्पासंदर्भात उदासीन धोरण  दिसून येत आहे.

- गणेश हूडनागपूर -  भूजल पातळी वाढविण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ही काळाजी गरज आहे.  याचा विचार करता  गत काळात नागपूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेलची देशपातळीसोबतच ‘युनिसेफ’सारख्या जागतिक पातळीवरील संस्थेने दखल घेतली होती. मात्र मागील एक-दिड वर्षात  प्रकल्पासंदर्भात उदासीन धोरण  दिसून येत आहे. मंजूर १०६८ कामापैकी अनेक कामे रखडलेली आहेत. त्यात नवीन प्रकल्प हाती घेण्यात आलेली नाहीत.

अशात शहर असो अथवा ग्रामीण भागात सर्वत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा वाढला आहे. त्यातच इमारतीच्या छतांवरील पावसाचे पाणी नदी-नाल्याद्वारे वाहून जात आहे. उपसा वाढल्याने भूजल पातळीही खालावित आहे. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक विहिरी, बोअरवेल कोरड्या पडतात. नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. याचा विचार करता जि.प.च्यावतीने ग्रामीण भागातील शासकीय इमारतींमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करून तेथील पाण्याची पातळी वाढविण्यावर भर दिला जातो. सोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंगला ‘आधुनिकते’ची जोडही देण्यात आली.

शासनाने २००२ मध्येच सर्व शासकीय इमारतींवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक केली आहे. परंतु, त्याची अजून तरी पूर्णपणे अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर जि.प.कडून तत्त्कालीन सीईओ योगेश कुंभेजकर यांच्या कार्यकाळात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र(पीएचसी),सोबतच १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून आणि मनरेगातुनही रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यशस्वीरित्या राबविल्या गेलेत. परंतु कुंभेजकर आणि मानकर यांची नागपूर येथून बदली झाल्यानंतर या चांगल्या प्रकल्पाकडे  जि.प.चे दुर्लक्ष झाल्याचे वास्तव आहे.  १०६८ कामे मंजूर वर्ष २०२१-२२ च्या आराखड्यात ६७९ व २०२२-२३ च्या आराखड्यात ३८९ अशी एकूण  होती. कामांना धडाक्यात सुरुवात झाली होती. परंतु पुढे हा प्रकल्प थंड बस्त्यात पडला.  विशेष म्हणजे, जि.प.च्या पाऊस पाणी संकलन व ऊर्जासंवर्धन आणि पर्यावरणाचे जतन या आधुनिक पद्धतीची जोड असलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेलची जागतिक पातळीवर काम करणाऱ्या  ‘युनिसेफ’ संस्थेकडूनही दखल घेण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर