शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नागरिकांनी स्वयंप्रेरणेने केले रेन वॉटर हार्वेस्टिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 11:14 IST

यंदाच्या उन्हाळ्यात वाडीमधील नागरिकांनी कधी नव्हे एवढी पाण्याची टंचाई अनुभवली. त्या अनुभवातून शहाणे होत वाडीमधील काही नागरिकांनी यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचा निर्धार केला.

ठळक मुद्देपाणी टंचाईने दिला धडावाडीतील लाईफस्टाईल संकुलातील नागरिकांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या उन्हाळ्यात वाडीमधील नागरिकांनी कधी नव्हे एवढी पाण्याची टंचाई अनुभवली. त्या अनुभवातून शहाणे होत वाडीमधील काही नागरिकांनी यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचा निर्धार केला. वाडी परिसरातील लाईफस्टाईल टाऊनशिपमधील नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टींगचा शास्त्रोक्त मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कोणताही अनुभव नसताना, त्यासाठीचे सर्व नियोजन आणि कार्यवाही नागरिकांनी स्वत: केली.वाडी परिसरातील अ‍ॅटोमिक एनर्जी डेपो रोडवर वसलेल्या लाईफस्टाईल टाऊनशिपमध्ये २२४ फ्लॅट्स आहे. यात एक हजारपेक्षा जास्त लोक निवास करतात. वाडी परिसराला वेणा जलाशयातून पाणीपुरवठा होतो. यावर्षीच्या उन्हाळ्यात जलाशय कोरडा झाला. पाण्याचे बोअरवेलसारखे स्रोत कोरडे पडले. त्यामुळे वाडीमध्ये पाणी खरेदी करून पिण्याची वेळ नागरिकांवर आली होती. ही टंचाई येथील रहिवाशांना पाण्याचे महत्त्व शिकवून गेली.त्यांनी प्रशासनाला दोष देण्यापेक्षा त्यावर उपाययोजना करण्याचा मानस बाळगला. पावसाचा प्रत्येक थेंब धरणीच्या पोटात साठवला तर पुढील वर्षी संकटकाळी त्या कोट्यवधी थेंबांचा वापर करता येईल, या विचारातून या सोसायटीतील नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विचार अंगिकारला.

टंचाईमुळे कळले महत्त्वसोसायटीतील काही नागरिक यासाठी पुढे आले. त्यांनी इतरांची समजूत घालण्यास सुरुवात केली. एक एक करता २२४ कुटुंबांमध्ये पाणी साठवण्याची एक नवी जागृती निर्माण झाली. सोसायटीच्या तज्ज्ञ मंडळींनीच परिसराचा अभ्यास केला. पाण्याचा प्रवाह कुठून कुठे वाहतो, एका तासाच्या पावसात किती लाख लिटर पाणी वाहून जाते, याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीची प्रक्रिया पार पाडली. पावसाळ्यातील चार महिन्यात नाल्यांमधून वाहून वाया जाणाऱ्या लाखो लिटर शुद्ध पाण्याची साठवणूक केली. सोसायटीच्या नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादाला केवळ यावर्षी अनुभवलेली पाणी टंचाई हे एकमेव कारण असल्याचे प्रा. अश्विनी मिरजकर, समीर जाधव, उमेश कौशिक, के. डब्ल्यू. शेलारे, संजय वानखेडे, विशाल साखरे यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी