शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत संततधार, रिपरिप अन् गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 11:26 IST

निसर्गाने नागपूरकरांना दुष्काळाचा चटका दिल्यानंतर आता सर्वत्र गारवा उधळला आहे. पाऊसझडीमुळे शहरातील तापमान घटून वातावरण आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे नागपूरकर सुखावले आहेत.

ठळक मुद्देतापमान घटले विदर्भासह जिल्हाभर मुसळधार बरसला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: निसर्गाने नागपूरकरांना दुष्काळाचा चटका दिल्यानंतर आता सर्वत्र गारवा उधळला आहे. पाऊसझडीमुळे शहरातील तापमान घटून वातावरण आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे नागपूरकर सुखावले आहेत.शहरात मंगळवारी दिवसभर पाऊस झाला. त्यामुळे शहरातील कमाल तापमान ६ डिग्री सेल्सियसने कमी होऊन २५ डिग्री सेल्सियसवर आले. तसेच, किमान तापमान २२.६ डिग्री सेल्सियसवर पोहोचले. शहरात सकाळी ८.३० वाजतापर्यंत ५.४ मिमी पावसाची नोंद झाली. विमानतळ परिसरात सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ४८.४ मिमी पाऊस पडल्याची माहिती मिळाली. पावसाची गती पाहता वस्त्यांमध्ये पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात होती.विदर्भातील अन्य शहरांतही मुसळधार पाऊस कोसळला. चंद्रपूर येथे १३२.९, गडचिरोली येथे ११८, ब्रह्मपुरीत १००.८, यवतमाळ येथे ३७.२, अमरावतीत २३.८, वाशीम येथे २३, गोंदियात २२, वर्धा येथे १७.६ तर, अकोला येथे ४.४ मिमी पाऊस पडला. याशिवाय अन्य शहरांतही पावसाने दमदार उपस्थिती नोंदवली. येत्या २४ तासात विदर्भातील विविध भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच, शहरात तीन दिवस पावसाची परिस्थिती कायम राहणार आहे. या पावसामुळे अनुशेष भरून निघत आहे.कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणामपूर्व मध्य प्रदेश ते छत्तीसगडदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य भारतात पावसाने जोर पकडला आहे. तसेच, बंगालच्या खाडीतही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी, विदर्भातील अनेक भागात येत्या ४८ तासानंतर पाऊस कोसळू शकतो.

टॅग्स :Rainपाऊस