शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

नागपुरात पाऊस धोधो बरसला....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 8:26 PM

शुक्रवारी सकाळी ११ वाजतापासून ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत ढगांच्या जोरदार गर्जनेसह सर्वदूर कोसळलेल्या पावसाने आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याने, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देसलग सहा तास पावसाची चौफेर फटकेबाजीनागपूरसह पूर्व विदर्भात पूरजन्य स्थितीशहरात घराघरात पाणी शिरलेठिकठिकाणी पाणी तुंबले, वृक्षांची पडझड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसासाठी हमीचे असणारे सर्वच नक्षत्र कोरडे गेले. ज्येष्ठ, श्रावण या महिन्यांतही अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र, या दोन्ही महिन्यांची भरपाई भाद्रपदाच्या अर्थात बैल पोळ्यापासूनच होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यात शुक्रवारी सकाळी ११ वाजतापासून ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत ढगांच्या जोरदार गर्जनेसह सर्वदूर कोसळलेल्या पावसाने आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याने, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पावसाच्या या संपूर्ण सिझनमध्ये प्रथमच असा तडाखेबंद पाऊस झाल्याने, सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असला तरी अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने आणि ठिकठिकाणी वृक्षांची पडझड झाल्याने, नागरिकांसह प्रशासकीय व्यवस्थेची तारांबळ उडाली आहे.पुणे आणि नागपूर वेधशाळेने केलेल्या भाकितानुसार शुक्रवारी अतिवृष्टीजन्य स्थितीचा अंदाज येत होता. 

शहराच्या सर्वच बाजारपेठा पाण्याने वेढल्या होत्या आणि प्रतिष्ठानांमध्येही पाणी शिरल्याची स्थिती होती. सर्वच जण घरातील आणि दुकानांतील पाणी बाहेर काढण्यासाठी जुंपले होते. मेडिकल चौक, राजाबाक्षा, जगनाडे चौक, रेशीमबाग, शांतीनगर, सहकारनगर, जयप्रकाशनगर, गोपालनगर, प्रतापनगर, सहकारनगर ते एअरपोर्ट मार्ग, हॉटेल प्राईड ते एअरपोर्ट मार्ग, खामला, नेल्को सोसायटी, न्यू आदर्श कॉलनी, क्रांतीसूर्यनगर, वीरचक्र कॉलनी, आदिवासी कॉलनी, विघ्नहर्ता कॉलनी, वृंदावन कॉलनी, फे्रण्डस कॉलनी हा संपूर्ण भाग नदी वाहावी अशासारखा दिसून येत होता. त्यामुळे, या मार्गावरून वाहन काढणे कठीण झाले होते. बेसारोड, कल्याणेश्वरनगरातील पाचशे घरात पाणी शिरल्याने, या भागात अग्निशमन दलाकडून भर पावसात पाणी उपसण्याचे काम सुरू होते. मेहंदीबाग अंडर रेल्वे ब्रिजमध्ये पाणी तुंबल्याने येथे अनेक वाहने फसलेल्या अवस्थेत दिसून येत होती. मेडिकल हॉस्पिटल परिसर आणि रुग्णांच्या वॉर्डात पाणी शिरल्याने हलकल्लोळ माजला होता. पाणी तुंबण्यासह अनेक ठिकाणी वृक्षांची पडझड झाल्याने, रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. तर काही ठिकाणी विद्युत व्यवस्था खोळंबली होती. विजेच्या तारा पडल्याच्या तक्रारीही अग्निशमन विभागाकडे आल्या आहेत. लकडगंज येथील जलाराम मंदिर, कच्ची विसा भवन,लकडगंज ग्राऊंडमधील रामकुंज भवन, मानेवाडा बेसा रोड, टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स, धाडीवाल ले-आऊट बुद्धविहार, हेरिटेज हॉटेल सिव्हिल लाईन्स, मानकापूर स्टेडियमचे एसी रूम, वर्धा रोड येथील सोनेगाव पोलीस ठाणे, नरेंद्रनगर येथील उमंग हाऊसिंग सोसायटी, आयटी पार्क परसोडी, फ्रेण्ड्स कॉलनी येथील सिंडिकेट बँकेच्या मागील भाग, उत्कर्षनगर येथील गणपती वर्माचें घर, रविनगर येथील जगत टॉवर्समधील दुकाने येथे पाणी शिरले होते. एकूण, एका दिवसाच्या तुफान पावसाने संपूर्ण व्यवस्थेची त्रेधातिरपिटी उडाली आहे. 
झाडे कोसळलीरविनगर येथील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या मागील भाग, सिव्हिल लाईन्स येथील सीपी क्लब, रिंगरोड उदयनगर येथील तपस्या विद्यालयात झाडे कोसळल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाला प्राप्त झाल्यानंतर, कर्मचाऱ्यांकडून या समस्या दूर करण्याचे युद्धस्तरावर कार्य सुरू होते. 
श्रीगणेश मंडळांची उडाली तारांबळतसे पाहता श्रीगणेश चतुर्थीपासूनच पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. त्याअनुषंगाने, शहरातील सर्वच श्रीगणेशोत्सव मंडळांनी व्यवस्था लावून ठेवलेली आहे. मात्र, शुक्रवारी दिवसभर बरसलेल्या पावसाने या मंडळांच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडवली. इतका तुफान पाऊस बरसेल, असा अंदाज न आल्याने ही स्थिती निर्माण झाली. अनेकांनी ताडपत्र्यांचे आवरण गणपतीच्या मूर्तीच्या स्टेजवर लावण्याचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे, आजच्या पावसाचा सर्वाधिक फटका छोट्या गणेश मंडळांना बसला. छोट्या मंडळांकडे या आपत्कालीन स्थितीचा सामना करण्याची व्यवस्था नसल्याने, स्वयंसेवकांची त्रेधातिरपिट उडाली होती.बाहेरगावी जाणारी वाहतूक व्यवस्था कोलमडलीया पावसाचा फटका बाहेरगावी जाणारे अगर बाहेरगावाहून येणाऱ्यांना बसला. बसेस वेळेवर सोडल्या गेल्या नसल्याने, प्रवाशांना एकाच ठिकाणी भर पावसात अडकून बसावे लागले. गडचिरोलीमार्गे जाणाऱ्या बसेसला पुराच्या स्थितीचा सामना करावा लागल्याची माहिती आहे. वैनगंगेचे पाणी पुलापर्यंत आल्याने, या बसेस बराच वेळ बामणी, काम्पा येथे अडवून ठेवण्यात आल्या होत्या. पाऊस थांबल्यानंतर, या बसेस स्थिती पाहून सोडण्यात आल्या.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर