शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

विदर्भात सर्वदूर पाऊस, नागपूर, वर्धामध्ये ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 11:03 IST

Nagpur News गुरुवारी सकाळी विदर्भात दमदार आगमन झाले. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देआठवडाभरापेक्षा अधिक कालावधीपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारच्या रात्रीपासून रिपरिप सुरू केली. त्यामुळे शेतकरी उत्साहाने कामाला लागले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील आठवडाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाचे अखेर गुरुवारी सकाळी विदर्भात दमदार आगमन झाले. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नागपूर प्रादेशिक केंद्राच्या हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. सकाळी साडेसात वाजल्यापासून नागपुरात आलेला पाऊस ९ वाजेपर्यंत सुरू होता. दुपारनंतर पुन्हा सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला. त्यानंतरही सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. शहरातील अनेक खोलगट भागातील वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने घरांमध्ये शिरले. यामुळे अनेक कुटुंबांची फजिती झाली. दिवसभारत ९९.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नागपूर ग्रामीणमध्येही अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने नदीनाले दुथडी भरून वाहिले. शेतातील अंकुरलेली आणि वाढीला लागलेली पिके पावसाअभावी सुकतात की काय, अशी भीती असतानाच आलेल्या दमदार पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली. उमरेड विभागात मुसळधार पाऊस पडला. रामटेक विभागात संततधार पावसाने शेतकरी समाधानी झाले. काटोल आणि नागपूर ग्रामीण विभागात मध्यम पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यात १०.५ मिलीमीटर पाऊस

विदर्भात गुरुवारी सर्वदूर पाऊस झाला. मागील २४ तासांत गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २३.३ मिलीमीटर पाऊस पडला. गोंदिया जिल्ह्यात ४१ मिलीमीटर तर वर्धा जिल्ह्यात २३ मिलीमीटर पावसाची नोंद गुरुवारी सकाळपर्यंत झाली होती. नागपूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत १०.५ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे.

सतर्कतेचा इशारा

भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस व वादळी वाऱ्यासह वीज पडण्याची शक्यता वर्तवली आहे. १० ते १२ जुलै या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी व नदी नाल्याजवळ राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा तसेच, घरातील दारे खिडक्या तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवण्याचा सल्ला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.

भंडारा जिल्ह्यात धान पऱ्ह्यांना जीवदान...

तब्बल आठवडाभराच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासूनच पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून धान पऱ्ह्यांना जीवदान मिळाले आहे. आता रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी धानाची पेरणी नर्सरीत केली होती. पऱ्हे रोवणीयोग्यही झाले होते; परंतु आठवडाभरापासून पावसाने दडी मारली होती. नर्सरीच्या जमिनीला तडे जात होते. नर्सरीतील पऱ्हे पिवळे पडू लागले होते. बळीराजाच्या नजरा चातकासारख्या आकाशाकडे लागल्या होत्या. अशातच बुधवारी सायंकाळपासून पावसाळी वातावरण तयार झाले. गुरुवारी पहाटे ५ वाजतापासून दमदार पावसाला प्रारंभ झाला. शहरात पहाटेपासून पाऊस बरसत होता तो दुपारी १.३० वाजेपर्यंत कोसळला.

जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाची हजेरी

गोंदिया : जिल्ह्यात तब्बल पंधरा दिवसांनंतर गुरुवारी (दि. ८) सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पऱ्ह्यांना संजीवनी मिळाली असून रोवणीच्या कामालासुद्धा वेग येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात गुरुवारी सकाळी ७ वाजतापासून पावसाला सुरुवात झाली आहे. सलग दोन तास झालेल्या पावसामुळे शेतातील बांधांमध्ये पाणी साचले होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मागील पंधरा दिवसांपासून उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या जिल्हावासीयांनासुद्धा दिलासा मिळाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम

चंद्रपूर जिल्ह्यातील १२ तालुक्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सहा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. २४ तासात २१६.५ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे धान उत्पादक तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक तालुक्यातील शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहे. आतापर्यंत कोरपना तालुक्यात सर्वाधिक ३९२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात गुरुवार पहाटेपासूनच पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यानंतर रोवणीच्या कामाला वेग आला आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस