शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

तिकिट चेकिंग मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी वर्षभरात पावणेपाच लाख प्रकरणे : २८ कोटींपेक्षा जास्तचे उत्पन्न

By नरेश डोंगरे | Updated: April 3, 2025 20:13 IST

बेशिस्त आणि फुकट्या प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून गेल्या वर्षभरात विविध रेल्वे गाड्यांमध्ये राबविण्यात आलेल्या तिकिट तपासणीच्या विशेष मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी लागली आहे.

नरेश डोंगरे नागपूर : बेशिस्त आणि फुकट्या प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून गेल्या वर्षभरात विविध रेल्वे गाड्यांमध्ये राबविण्यात आलेल्या तिकिट तपासणीच्या विशेष मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी लागली आहे. २८ कोटींपेक्षा जास्त महसूल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला प्राप्त झाला आहे. हा आतापर्यंतच्या कमाईचा उच्चांक असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी म्हटले आहे.

तिकिट न घेताच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणे, जनरलचे तिकिट काढून एसीत बसणे, सोबत असलेल्या साहित्याचे (लगेज) तिकिट न काढणे, असा प्रकार अवलंबणाऱ्या बेशिस्त प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या तसेच ठिकठिकाणची रेल्वे स्थानके आदी ठिकाणी एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत विशेष तिकिट तपासणी मोहिम राबविली. यात एकूण ४ लाख, ७४ हजार, ४१२ बेशिस्त प्रवासी तिकिट चेकरच्या हाती लागले. त्यातून रेल्वेच्या तिजोरीत २८ कोटी, १६ लाख, ३३ हजार, ६६३ रुपयांची गंगाजळी जमा झाली.

सर्वाधिक वसुली फुकट्यांकडूनतिकिट तपासणीमध्ये वर्षभरात २ लाख, ५७हजार, २५ फुकटे प्रवासी टीसींच्या हाती लागले. या प्रवाशांकडे कुठलेही तिकिट नसताना ते रेल्वेतून प्रवास करीत होते. त्यांच्याकडून टीसींनी १० कोटी, २८ लाख रुपये तिकिट भाडे आणि ६ कोटी, ८८ लाख दंड वसूल केला.तिकिट जनरलचे, प्रवास एसी कोचमधून !

जनरलचे तिकिट घेऊन खुशाल एसी कोचमध्ये प्रवास करणारे २ लाख, १२ हजार, ६९८ प्रवासी तिकिट चेकर्सना आढळले, त्यांच्याकडून ५ कोटी, ४७ लाखांचे भाडे आणि ५ कोटी, ४२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे लगेजची बुकिंग न करणारे ४, ६८९ प्रवासी आढळले. त्यांच्याकडून ८ लाख, ६० हजारांचे भाडे शुल्क आणि ४ लाख, ७४ हजारांचा दंड घेण्यात आला.तिकिट घ्या अन् प्रवास करा

रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करताना कुणीही विनातिकिट प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे. ज्या श्रेणीचे तिकिट असेल त्याच श्रेणीच्या डब्यातून प्रवास करा आणि सोबत सामान असेल तर त्याचीही रितसर बुकिंग करा. असे न केल्यास अतिरिक्त शुल्क आणि दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा ईशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.