शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

By नरेश डोंगरे | Updated: May 30, 2025 21:21 IST

अमृत भारत स्टेशन योजना आणि दुसऱ्या वेगवेगळ्या योजनांनुसार रेल्वेच्या नुतनीकरणाचा आणि विकास कामांचा धडाका सर्वत्र सुरू आहे. अनेक स्थानकांचा चेहरा मोहरा बदलून या स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

नरेश डोंगरेनागपूर : हजारो कोटींच्या खर्चाने महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्क प्रशस्त करणाऱ्या केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुन्हा एका रेल्वे स्थानकाचे नाव आणि कोड बदलविला आहे. सोबतच राज्यातील पुन्हा दोन रेल्वे स्थानकांची नावं आणि कोड भारतीय रेल्वेच्या नकाशावर बदललेली दिसणार आहे.

अमृत भारत स्टेशन योजना आणि दुसऱ्या वेगवेगळ्या योजनांनुसार रेल्वेच्या नुतनीकरणाचा आणि विकास कामांचा धडाका सर्वत्र सुरू आहे. अनेक स्थानकांचा चेहरा मोहरा बदलून या स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. सोबतच नवीन सेकंड, थर्ड आणि फोर्थ लाईनची (ट्रॅकची) निर्मिती, त्यासाठी जागोजागी बांधण्यात आलेले ओव्हर ब्रीज आणि अंडर ब्रीज, अॅटोमेटीक सिग्नल सिस्टमसह वेगवेगळ्या नव्या सिस्टम सुरू करून एकूणच भारतीय रेल्वेच्या संपूर्ण नेटवर्कला नवीन लूक देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे करतानाच वर्षभरापूर्वी महाराष्ट्रातील चार रेल्वे स्थानकांची नावं बदलविण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागपूरच्या ईतवारी रेल्वे स्थानकाचे नाव 'नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानक' असे करण्यात आले. आता

भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाच्या नवीन नावाला आणि कोडला मंजूरी दिली आहे. आधी या स्थानकाचे नाव उस्मानाबाद रेल्वे स्टेशन आणि कोड यूएमडी होता. तर आता रेल्वेच्या नकाशावर या स्थानकाचे नाव धाराशिव तर कोड डीआरएसव्ही राहणार आहे. १ जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी ३१ मे च्या रात्री ११.४५ पासून तो पुढच्या पावणेदोन तासांसाठी प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) बंद केली जाणार आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रातील दोन रेल्वे स्थानकांची नावं बदलली गेली आहे. तर, अहमदनगर आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलाच्या प्रतिक्षेत आहे. आधी झालेल्या निर्णयानुसार, अहमदनगर रेल्वे स्थानकाला अहिल्यानगर रेल्वे स्थानक आणि औरंगाबाद स्थानकाला छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक म्हणून नाव दिले जाणार आहे.अंमलबजावणीसाठी उच्चस्तरावर प्रयत्न

अहिल्यानगर हे स्थानक मध्य रेल्वेच्या तर छ. संभाजीनगर स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येते. या दोन्ही स्थानकांच्या नामांतराच्या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार असून, उच्चस्तरावर तसे प्रयत्न सुरू असल्याचे संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.