शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

कोळशाच्या व्यवहारात रेल्वेची अवघ्या महिनाभरात कोट्यवधींची कमाई

By नरेश डोंगरे | Updated: February 10, 2024 21:26 IST

माल वाहतुकीतून मध्य रेल्वे मालामाल.

नागपूर : कोळशाच्या व्यवहारात हात काळे, अशी एक म्हण आहे. मात्र, मध्य रेल्वेने त्या म्हणीवर 'कोटी' करत आपली तिजोरी लबालब करून उपरोक्त म्हण खोटी ठरवली आहे. कोळसा वाहतुकीतून अवघ्या महिनाभरात मध्य रेल्वेने तब्बल ४१७.३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या शिवाय अन्य साहित्य, मालाची ने-आण करून रेल्वे प्रशासन मालामाल झाले.

गेल्या जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेने कोणकोणत्या साहित्याची, चिजवस्तूंची वाहतुक करून किती रुपयांची कमाई केली, त्याचा अहवाल प्रसिद्धीला दिला आहे. त्यानुसार, जानेवारी २०२४ या एका महिन्यात मध्य रेल्वेने तब्बल १०१५ रॅक कोळशाची वाहतूक केली. त्यातून रेल्वेला ४१७.३१ कोटी रुपयांचा घसघशीत महसुल मिळाला. गेल्या वर्षी याच महिन्यात मध्य रेल्वेने ९८४ रॅक कोळसा लोड करून ३९७.२८ कोटी रुपये मिळवले होते. त्या तुलनेत यंदाच्या जानेवारी महिन्यांची कमाई ५ टक्के जास्त आहे.

कोळशाप्रमाणेच रेल्वेने गेल्या महिन्यात लोहखनिजाच्या ४६ रॅक लोड करून ३६. ६ कोटी रुपये मिळवले. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात ही कमाई केवळ १.५४ कोटी रुपये होती. सिमेंटच्या २३ रॅक लोड करून १८ . १ कोटी रुपये मिळवले तर क्लिंकरच्या २३ रॅकची वाहतूक करून १२.२ कोटीची कमाई केली आहे.

साखरेने दिले १.२३ कोटीअशाच प्रकारे रेल्वेने डीओसी, डोलोमाईट, फ्लाय ॲश, फेरो मॅगनिज आणि लष्करासाठी लागणाऱ्या अन्य साहित्याची वाहतूक करून सुमारे १२ कोटी रुपयांची कमाई केली. साखरेच्या ४ रॅकची वाहतूक करून रेल्वेने १.२३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात रेल्वेने साखर वाहतुकीतून केवळ ४७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.

टॅग्स :nagpurनागपूर