शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत नोकरीचे आमिष : ११ लाख, ५० हजार हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:02 IST

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी येथील एका तरुणाकडून ११ लाख ५० हजार रुपये हडपले. रक्कम घेतल्यानंतर आरोपी टाळाटाळ करीत असल्याचे पाहून, फिर्यादी राजेंद्र रामदास वाहणे (वय ३५) यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देनागपूरच्या जरीपटक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी येथील एका तरुणाकडून ११ लाख ५० हजार रुपये हडपले. रक्कम घेतल्यानंतर आरोपी टाळाटाळ करीत असल्याचे पाहून, फिर्यादी राजेंद्र रामदास वाहणे (वय ३५) यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला. मोरेश्वरजी बोकडे (वय ३९, रा. अहमदनगर) आणि आकाश सिंग (वय ४०, रा. कोलकाता) अशी आरोपींची नावे आहेत.वाहणे न्यू इंदोऱ्यातील रिपब्लिकन नगरात राहतात. ते सधन कुटुंबातील आहेत. चांगल्या रोजगाराच्या शोधात असलेल्या वाहणेंना गेल्या वर्षी एका मित्राने रेल्वेत एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत आपले संबंध असल्याचे सांगून, आरोपी बोकडे आणि सिंगसोबत ओळख करून दिली. या दोघांनी वाहणेंना रेल्वेत टीसी (तिकीट तपासणीस) म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्याबदल्यात आरोपींनी वाहणेंकडून १३ मार्च ते २८ एप्रिल २०१७ या दीड महिन्याच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने ११ लाख ५० हजार रुपये घेतले. वाहणोंचा विश्वास बसावा म्हणून आरोपींनी त्यांना रेल्वेचे बनावट कॉल लेटर आणि अन्य कागदपत्रे पाठवली. आपण रेल्वेत तिकीट चेकर बनू, अशी कल्पना रंगविणाºया वाहणेंनी रक्कम दिल्यानंतर आरोपींकडे नियुक्तीसाठी तगादा लावला.प्रत्येक वेळी काही ना काही कारणे सांगून टाळणाऱ्या आरोपींचा वाहणेंना संशय आला. त्यामुळे त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आरोपी बोकडे आणि सिंगकडून मिळालेली कागदपत्रे दाखवली. ही कागदपत्रे बनावट असल्याचे आणि रेल्वे खात्याचा या कागदपत्रांशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक केल्याचे ध्यानात आल्याने वाहणेंनी आरोपींना आपली रक्कम परत मागतिली असता आरोपींनी वाहणेंसोबत संपर्क तोडला. त्यामुळे त्यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. सहायक उपनिरीक्षक भांगे यांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.अनेकांची फसगतआरोपींनी वाहणेंसारखीच अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. पोलिसांत गेल्यास आपली रक्कम परत मिळणार नाही, असा धाक असल्याने फसगत झालेले पीडित बरेचदा पोलिसांकडे जाण्याचे टाळतात. या प्रकरणातही अशाप्रकारचे अनेक पीडित असल्याचा संशय आहे. पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीrailwayरेल्वे