शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

वैदर्भीयांच्या गोवा टूरमध्ये रेल्वेचा खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 10:04 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून उन्हाळ्यात अजनी ते करमाळी ही स्पेशल रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. परंतु ही गाडी मुदत संपल्यानंतर रेल्वेने बंद केली. यामुळे गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देअजनी-करमाळी गाडी केली बंद कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना फटका

दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह विदर्भातून हजारो पर्यटक गोवा आणि कोकणात जातात. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून उन्हाळ्यात अजनी ते करमाळी ही स्पेशल रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. या गाडीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. परंतु ही गाडी मुदत संपल्यानंतर रेल्वेने बंद केली. यामुळे मुंबई, कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. विदर्भातील पर्यटकांची रेल्वेच्या या निर्णयामुळे गैरसोय होत असून, रेल्वेला विदर्भातील पर्यटकांचे वावडे आहे की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वेने या मार्गावर त्वरित रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी होत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून उन्हाळ्यात ०१११९/०११२० अजनी-करमाळी-अजनी ही स्पेशल रेल्वेगाडी ९ एप्रिल ते ५ जून या कालावधीत सुरू करण्यात आली. ही गाडी अजनीवरून सुटून वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम या मार्गाने करमाळीला जात होती. विदर्भातून हजारो पर्यटक कोकणात आणि गोव्याला पर्यटनासाठी जातात. यामुळे या गाडीला विदर्भातील पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. खुद्द रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही या गाडीला प्रचंड प्रतिसाद असल्याचे मान्य केले होते. परंतु मुदत संपल्यामुळे ५ जूनला अखेरची फेरी झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने ही गाडी बंद केली. यामुळे विदर्भातील पर्यटकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. पावसाळ्यात कोकणात आणि गोव्याला विदर्भातील हजारो पर्यटक जातात. रेल्वे बोर्डाने ही गाडी बंद केल्यामुळे आता पर्यटकांना टप्प्याटप्प्याने प्रवास करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे पर्यटकांना मोठा त्रास होत असून, रेल्वे बोर्डाने विदर्भातील पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन कोकण-गोव्याला जाण्यासाठी नियमित रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी होत आहे.

मुंबईसाठीही होती अतिरिक्त रेल्वेगाडीअजनी-करमाळी ही रेल्वे बोर्डाने बंद केलेली रेल्वेगाडी केवळ कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठीच उपयुक्त नव्हती, तर ही गाडी कल्याणपर्यंत जात असल्यामुळे मुंबईला जाणाऱ्यांसाठीही महत्त्वाची होती. मुंबई मार्गावर प्रवाशांची संख्या खूप अधिक असल्यामुळे मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात नेहमीच वेटिंगची स्थिती पाहावयास मिळते. त्यामुळे मुंबईसाठी उपलब्ध झालेली ही अतिरिक्त गाडी बंद झाल्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा फटका बसला आहे.‘नागपूरवरून गोव्यासाठी रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मागील वर्षापासून रेल्वे बोर्डाकडे केलेली आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने उन्हाळ्यात तीन महिन्यासाठी अजनी-करमाळी ही रेल्वेगाडी सुरू केली. मुदत संपल्यानंतर ही गाडी बंद करण्यात आली. कोणतीही नवी गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्ड घेते. नवी रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी कोचेस उपलब्ध होणे गरजेचे असते. त्यामुळे कोच उपलब्ध झाल्यानंतर रेल्वे बोर्ड गोव्याला रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय घेईल.’-कुश किशोर मिश्र, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे

टॅग्स :tourismपर्यटन