शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे कार्यालय अधीक्षकाने चोरले लोखंड : आरपीएफने केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 22:23 IST

रेल्वेचे लोखंड चोरी केल्या प्रकरणी एका कार्यालय अधीक्षकालाच रेल्वे सुरक्षा दलाने अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ५०० किलो लोखंड चोरी केल्यामुळे आरपीएफच्या पथकाने रेल्वे अधिकाऱ्यासह तिघांना अटक केली.

ठळक मुद्दे१२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेचे लोखंड चोरी केल्या प्रकरणी एका कार्यालय अधीक्षकालाच रेल्वे सुरक्षा दलाने अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ५०० किलो लोखंड चोरी केल्यामुळे आरपीएफच्या पथकाने रेल्वे अधिकाऱ्यासह तिघांना अटक केली.राजकुमार निखारे असे आरोपीचे नाव आहे. तो अजनी येथे रेल्वे वाहतूक विभागात कार्यरत आहे. ३१ मे रोजी अजनी येथील डीटीआय कार्यालय परिसरातून लोखंडाची चोरी झाली. यानंतर गौसिया कॉलनी, दिघोरी येथील एका भंगार दुकानात त्याने लोखंडाची विक्री केली. लोखंड चोरी झाल्याने आरपीएफ वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. आरपीएफला मिळालेल्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, शिवराम सिंह, कॉन्स्टेबल लोकेश राऊत यांचे पथक तैनात करण्यात आले. या पथकाने दिघोरी भागात संबंधित भंगार खरेदी करणाऱ्या दुकानाच शोध लावला व त्या दुकानाचा मालक प्रवीण गवरे याला ताब्यात घेतले.प्रवीणचे प्रवीण अ‍ॅन्ड ब्रदर्स प्लास्टिक स्क्रॅप सप्लायर्स नावाचे दुकान आहे. चौकशीत सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली. मात्र, नंतर रेल्वेचे पाईप खरेदी केल्याचे कबुल केले. त्याच्या दुकानातील रेल्वेच्या मालकीचे असलेले लोखंडी पाईप जप्त करण्यात आले. हे लोखंड अजनी येथे रेल्वेत कार्यरत राजकुमार निखारे याच्याकडून खरेदी केल्याचे त्याने सांगितले. त्या आधारे निखारे याला अटक करण्यात आली. लोखंड चोरी झालेल्या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक सुरेश पेठे (५०) कार्यरत होता. निखारेने सुरक्षा रक्षकाच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबूल केले. त्यामुळे या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेtheftचोरीArrestअटक